Video: कुत्रे पकडणारी गाडी आली, पळा..पळा.., कुत्र्यांच्या भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल, लोक पोट धरुन हसले!

जीन्स आणि लाल शर्ट घातलेला एक मुलगा बंधाऱ्याजवळ येतो, जिथं 4 कुत्रे आधीच आराम करत आहेत. तो येताच ओरडतो, 'भावांनो... कुत्रे पकडणारी गाडी येत आहे, पळा..पळा...'. हे ऐकून ते चारही कुत्रे तिथून धूम ठोकतात.

Video: कुत्रे पकडणारी गाडी आली, पळा..पळा.., कुत्र्यांच्या भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल, लोक पोट धरुन हसले!
कुत्र्यांचा हसवणारा व्हिडीओ

सोशल मीडियाच्या या युगात एखादी गोष्ट व्हायरल होणे, ही काही मोठी गोष्ट नाही. तुम्हाला फक्त एका चांगल्या आणि मजेदार व्हिडिओची गरज आहे आणि तुमचा व्हिडिओ जगभरात प्रसिद्ध होईल. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील, जे चर्चेत आहेत आणि खूप मजेदारही आहेत. असे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे खूप मजेदार असतात आणि ते पाहून लोकांना हसू आवरत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो इतका मजेशीर आहे की तुम्हाला नक्कीच हसू येईल. ( man shouted dogs catching vehicle is coming after hearing that 4 dogs ran away Funny Video goes viral )

तुम्ही कुत्रे पाहिले असतील. काही रस्त्यावरची भटकी कुत्री असतात तर काही लोक कुत्रे पाळतात आणि त्यांच्यावर खूप प्रेम करतात. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही रस्त्यावरील भटकी कुत्रे आहेत. पण तितक्यात, अशी काही गोष्ट ऐकून ते पळून जातात, जे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस कसा ओरडतो आणि कुत्र्यांना पळवून लावतो.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जीन्स आणि लाल शर्ट घातलेला एक मुलगा बंधाऱ्याजवळ येतो, जिथं 4 कुत्रे आधीच आराम करत आहेत. तो येताच ओरडतो, ‘भावांनो… कुत्रे पकडणारी गाडी येत आहे, पळा..पळा…’. हे ऐकून ते चारही कुत्रे तिथून धूम ठोकतात. तेव्हा ती व्यक्ती म्हणते, ‘मी या कुत्र्यांना वाचवलं आहे’.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by mosin khan (@mosin_khan1423)

हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर mosin_khan1423 या युजरने त्याच्या अकांऊटवरुन शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 25 मिलियन्सहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 20 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘तुम्हीही पळा, नाहीतर ते तुम्हालाही पकडून नेतील’, तर दुसऱ्या यूजरने ‘अरे पळा, पण तुमचं काय होईल ते आधी पाहा’

त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘भाई, तुमचा आवाज ऐकून कुत्रे घाबरून पळून गेले’, तर दुसऱ्या यूजरने ‘भाई, तुम्हीही लवकर पळून जा’ असे लिहिले आहे. तथापि, यादरम्यान, अनेक वापरकर्त्यांनी व्हिडिओचे वर्णन खूप मजेदार आहे आणि व्हिडिओच्या निर्मात्याचे कौतुक केले आहे.

हेही पाहा:

Video: मालकाने कोंबडीला पिंजऱ्यात डांबलं, त्यानंतर कोंबड्याने असं काही केलं की, नेटकरी कोंबड्याच्या प्रेमात पडले!

Video: हात नसलेल्या चिमुरड्याला जेव्हा कृत्रिम हात बसवतात, पाहा त्याची न विसरता येणारी रिएक्शन!

 

Published On - 2:04 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI