Viral Video : लग्नाच्या कपड्यांची ऑर्डर रद्द केल्यानं संतापली नववधू? दुकानातच घातला गोंधळ, पाहा काय केलं…

Viral Video : लग्नाच्या कपड्यांची ऑर्डर रद्द केल्यानं संतापली नववधू? दुकानातच घातला गोंधळ, पाहा काय केलं...
गोंधळ घालणारी वधू

एक घटना चीन(China)च्या चोंगक्विंग शहरात पाहायला मिळाली. सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेनं ब्राइडल सलूनमध्ये जाऊन लग्नाचे कपडे एकामागून एक फाडले.

प्रदीप गरड

|

Jan 18, 2022 | 1:12 PM

लग्नात वधूसाठी तयार केलेला ड्रेस अचानक रद्द करण्यात आला आणि दुकानदारानं त्यासाठी घेतलेली आगाऊ रक्कमही परत केली जाणार नाही, असं म्हटलं तर काय होईल? वधू (Bride) नेमकं काय करेल अशावेळी, हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. वधूचा रोष समजू शकतो. परंतु त्या बदल्यात काय होईल, याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. अशीच एक घटना चीन(China)च्या चोंगक्विंग शहरात पाहायला मिळाली. सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेनं ब्राइडल सलूनमध्ये जाऊन लग्नाचे कपडे एकामागून एक फाडले. ही घटना घडली जेव्हा स्टोअरनं ऑर्डर रद्द केली आणि नंतर त्याचा अॅडव्हान्सही देण्यास नकार दिला.

कात्रीनं कापले कपडे

जियांग असं या महिलेचं नाव आहे. चीनच्या नैऋत्य शहर चोंगक्विंगमधल्या वधूच्या सलूनमध्ये कात्रीनं लग्नाचे कपडे कापतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल झालाय. ही घटना 9 जानेवारी रोजी घडली होती. डेली मेलनं चिनी मीडिया आउटलेट सोहूचा हवाला देत आपल्या अहवालात म्हटलंय, की जियांगनं $11,000 (8,12,063 रुपये) किंमतीचे 32 लग्नाचे कपडे खराब केले. दुकानानं महिलेला $1,250 (रु. 92,813) रद्द केलेल्या लग्नाच्या पॅकेजसाठी $550 (रु. 40,837)ची आगाऊ रक्कम परत करण्यास नकार दिल्यानं ही घटना घडली.

कोणाचंही ऐकलं नाही

चिनी सोशल मीडिया नेटवर्क्स वीबो आणि ट्विटरद्वारे पोस्ट केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक संतप्त महिला स्टोअरमध्ये गोंधळ घालताना दिसून आली. न थांबता एकामागून एक कपडे ती कापताना दिसतेय. व्हिडिओ रेकॉर्ड करणारी महिला पार्श्वभूमीत असे म्हणताना ऐकू येतंय, की ‘विचार कर, या कपड्यांची किंमत अनेक हजार युआन (चीनी चलन) आहे!’ यावर वधू बेफिकीरपणे उत्तर देते, ‘हजारो? ते कितीही हजार असू दे. पण ते ठीक आहे. जियांगनं दुकानातल्या कपड्यांचा ढीग तर उद्ध्वस्त केलाच, पण 1,500 डॉलर्सचे लाल आणि सोनेरी रंगाचे पारंपरिक चिनी वेडिंग गाऊनही पूर्णपणे नष्ट केले.

Video : लाख मिळतील, पण तुझ्यासारखी तूच..! वधूला पाहून वराला कोसळलं रडू, नंतर हात धरून मनसोक्त केला डान्स

Video : खिडकीतून घरात घुसत चोरट्यानं पोलिसांना दाखवला डेमो, यूझर्स म्हणाले…

Viral Video : कोणत्या मित्रांपासून दूर राहावं? जाणून घ्या, फक्त 5 सेकंदांत…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें