Video: मजा मस्ती करणारं चिंपांझींचं सुखी कुटुंब, व्हिडीओला नेटकऱ्यांकडून भरभरुन प्रतिसाद

व्हायरल झालेला हा व्हिडिओ केवळ 20 सेकंदांचा आहे. पण हे पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच उमटेल. चला तर मग आधी जाणून घेऊया काय आहे या व्हिडिओमध्ये

Video: मजा मस्ती करणारं चिंपांझींचं सुखी कुटुंब, व्हिडीओला नेटकऱ्यांकडून भरभरुन प्रतिसाद
पिलासोबत खेळणारा चिंपांझी

सोशल मीडियाच्या जगात प्राण्यांशी संबंधित गोंडस व्हिडिओ व्हायरल होत असतात. जर आपण वन्यजीवांबद्दल बोललो, तर चिंपांझी हा नेटकऱ्यांच्या आवडत्या प्राण्यांच्या यादीत आहे. यामुळेच चिंपांझीशी संबंधित कोणताही व्हिडिओ शेअर केला तर तो लगेच व्हायरल होतो. सध्या, चिंपांझींच्या कुटुंबाचा व्हिडिओ समोर आला आहे, जो तुमचा दिवस बनवण्यासाठी पुरेसा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल की, प्राण्यांमध्येही माणसासारख्याच भावना असतात. हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सची मनं जिंकत आहे. (Animal Viral Video Chimpanzees playing with their baby netizens says so cute funny video)

व्हायरल झालेला हा व्हिडिओ केवळ 20 सेकंदांचा आहे. पण हे पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच उमटेल. चला तर मग आधी जाणून घेऊया काय आहे या व्हिडिओमध्ये, जो सोशल मीडियावर लोकांची मने जिंकत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक चिंपांझी जमिनीवर पडलेला दिसत आहे. ज्याच्या पोटावर चिंपांझीचे लहान मूल पडलेले आहे. त्याच वेळी, एक तिसरा चिंपांझी, जो बहुधा मुलाचा बाप आहे, त्याच्यासोबत प्रेमाने मजा करताना दिसतो. एखादी व्यक्ती आपल्या मुलांसोबत जशी मजा करते तसेच हे तिघे आपापसात मस्ती करताना दिसतात.

चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहूया.

चिंपांझीच्या कुटुंबाचा हा अतिशय गोंडस व्हिडिओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केला आहे. IFS ने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘एक कुटुंब जे एकत्र राहते आणि खेळते.’ हा व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे. चिंपांझीच्या कुटुंबाचा हा व्हिडीओ लोकांना किती आवडला आहे, याचा अंदाज यावरूनच लावता येतो की, याला आतापर्यंत जवळपास 50 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. सुमारे 4 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे, तर सुमारे 600 लोकांनी तो रिट्विट केला आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर भरभरून कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे जे म्हणतात की प्राण्यांना भावना नसतात. हे पाहिल्यानंतर त्यांना वाटेल की त्यांच्यात माणसांपेक्षा जास्त प्रेम आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, हा व्हिडिओ किती क्यूट आहे.

हेही वाचा:

Video: पोरगं घ्या, पोरगं…50 हजाराला पोरगं… या बापावर मुलांना विकण्याची वेळ का आली?

Video: मालकासोबत व्यायाम करणारा कुत्रा, नेटकरी म्हणाले, याहून हुशार कुत्रा पाहिला नाही!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI