किल्ल्याच्या पायथ्याशी औरंगजेबचा खजीनाचा व्हिडिओ व्हायरल, नागरिकांकडून रात्री-बेरात्री गुप्तधनाचा शोध, शेतकऱ्यांनी केला असा उपाय
Chhaava Movie Scene Secret treasure: नागरिकांनी खजीना शोधण्यासाठी खोदकाम सुरु केले. खजिना शोधण्यासाठी केलेल्या खड्ड्यांमुळे शेताचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हारुन शेख यांनी स्वखर्चाने त्यांच्या शेतावर सीसीटीव्ही लावले आहे. त्यामुळे किल्ल्यावर येणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे.

Chhaava Movie Scene Secret treasure: सध्या देशभर गाजत असलेला छावा चित्रपटामुळे क्रूर औरंगजेबची चर्चा होत आहे. औरंगजेबचे महत्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या ठिकाणी गुप्त खजीना असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बुऱ्हाणपूरमधील असीरगढ किल्यावर हजारोंच्या संख्येने लोक येऊ लागले. या व्हायरल व्हिडिओनंतर खजीना शोधण्यासाठी नागरिकांची रात्री-बेरात्री किल्ल्याच्या पायथ्याशी गर्दी झाली. लोकांनी किल्ल्याच्या पायथ्याशी गुप्तधन शोधण्यासाठी खोदकाम सुरु केले. यामुळे किल्ल्याच्या परिसरात असलेल्या शेतांचे नुकसान गर्दीमुळे होऊ लागली. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त लावला. तर शेतमालकांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.
काय घडला प्रकार?
बुऱ्हाणपूर जिल्ह्याच्या असीरगढ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हारून शेख या शेतकऱ्याच्या शेतात मुघलकालीन औरंगजेबचा खजिना असल्याची अफवा उडाली. त्यानंतर हा खजीना मिळवण्यासाठी रात्री बेरात्री नागरिकांनी शोध सुरु केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर होणारी गर्दी पाहता आणि शेतकऱ्याच्या शेताचे नुकसान पाहता शेतकऱ्याने आता शेतावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. तसेच शेतावर पोलीस बंदोबस्त सुद्धा लावला आहे.
शेतीचे मोठे नुकसान
नागरिकांनी खजीना शोधण्यासाठी खोदकाम सुरु केले. खजिना शोधण्यासाठी केलेल्या खड्ड्यांमुळे शेताचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हारुन शेख यांनी स्वखर्चाने त्यांच्या शेतावर सीसीटीव्ही लावले आहे. त्यामुळे किल्ल्यावर येणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे.
छावामधील त्या दृश्यानंतर अफवा
छावा सिनेमात संभाजी महाराजांनी मुघल साम्राज्याच्या बुऱ्हाणपूर येथे हादरा देण्याचे दृश्य होते. यामुळे लोकांना बुऱ्हाणपूरच्या किल्ला परिसरात मुघलांनी खजिना पुरल्याची शंका आली. यामुळे तीन दिवसांपूर्वी अचानक रात्री हजारोंच्या संख्येने नागरिक बॅटरी, मेटल डिटेक्टर घेऊन आले. त्यांनी त्या ठिकाणी खोदकाम सुरु केले. या खोदकाममध्ये काही जणांना सोने मिळाल्याचे दावे करण्यात आले.
मुघल इतिहास अन् खजिना
बुऱ्हाणपूर शहर हे मुघलांचे महत्वाचे सत्ताकेंद्र होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुघलांचा खजीना होता. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरमध्ये लूटही केली होती. तसेच मोहिमा संपल्यानंतर सैनिकांनी आपले मौल्यवान धन येथेच पुरल्याचे दावे केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी किल्ला परिसरात खोदकाम सुरु केले.
