हा रिक्षा चालक महिन्याला कमावतो ३ लाख, कोट्यवधींचा मालक.. स्वत: सांगितला कमाईचा मार्ग
एका रिक्षा चालकाची कमाई ऐकून तुम्हीही चकित व्हाल. तो केवळ पाच कोटी रुपयांच्या दोन भव्य बंगल्यांचा मालक नाही, तर दरमहा ३ लाख रुपये कमावतो. चला जाणून घेऊया कशी करतो कमाई...

कर्नाटकच्या बेंगलुरूमध्ये एका रिक्षा चालकाची कमाई या विषयावर सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. वास्तविक, या ऑटोरिक्षा ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार तो ५ कोटींच्या दोन भव्य बंगल्यांचा मालक आहे. दरमहा तो ३ लाख रुपये कमावतो. आकाश आनंदानी नावाच्या युवकाने या ऑटो ड्रायव्हरशी संवाद साधला. त्यावेळी त्याने हे सांगितले आहे. नंतर आकाशने हे सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर शेअर केले आहे.
काहीच क्षणांत रिक्षा चालका विषयीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. युजर्सनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. आकाशशी बोलताना ऑटो ड्रायव्हरने हाही दावा केला की तो एका एआय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतो. मात्र, Tv9 मराठी या दाव्यांची पुष्टी करत नाही.
वाचा: गौतमी पाटीलची दर महिन्याची कमाई किती? आकडा वाचून फुटेल घाम
Bangalore is fucking crazy the auto wala bhaiya said he has 2 houses worth 4-5 crs 😭 both on rent earns close to 2-3 lakhs per month , and is a startup founder / investor in a ai based startup bruh 😭😭😭
— Akash Anandani (@Kashh56) October 4, 2025
‘ऑटो ड्रायव्हरच्या कमाईचं रहस्य’
आकाश आनंदानीने एक्सवर पोस्ट केली की, बेंगलुरू खूप क्रेझी आहे, रिक्षा चालक म्हणाला की त्यांच्याकडे ४-५ कोटींची दोन घे आहेत. दोन्ही भाड्याने दिली आहेत, ते दरमहा अंदाजे २-३ लाख कमावतात आणि एका एआय आधारित स्टार्टअपमध्ये संस्थापक/गुंतवणूकदार आहेत. आकाशची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. युजर्सही या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्स करत आहेत. आकाश आनंदानीच्या म्हणण्यानुसार, ड्रायव्हरने त्यांना सांगितलं की हे त्यांचं पहिलं काम होतं ज्यातून त्यांनी सुरुवात केली होती. त्यामुळे ते वीकेंडला कधीकधी रिक्षा चालवतात. आकाशने लिहिलं की, मी ऑटोरिक्षा ड्रायव्हरला प्रश्न विचारले कारण त्याने अॅपलची स्मार्ट वॉच आणि एअरपॉड्स घातले होते.
युजर्सनी दिल्या मजेदार प्रतिक्रिया
काही युजर्सनी यावर चकीत होऊन प्रतिक्रिया दिली तर काहींनी हे मजा म्हणून घेतले आहे. एका युजरने पोस्टवर कमेंट करत लिहिल की, त्याने दारु पिली असावी. दुसऱ्याने एका यूजरने लिहिले की, मला हे फक्त एक कथा वाटत आहे. असं होऊच शकत नाही. इतर युजरने लिहिलं की, सावध राहा. कदाचित तो तुला कुठल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडेल आणि तिथे फसवणूक होईल. आजकाल लोक असे बोलून फसवतात.
