‘आमची गर्लफ्रेंड नसते, थेट…’ बिहारी मुलाच्या उत्तराने बसेल धक्का, या व्हिडिओचा इंटरनेटवर जोरदार चर्चा,Video पाहा
Funny Video : या मुलाचं इन्स्टाग्रामवर तुफान आलं आहे. त्याच्या मुलाखतीने व्ह्युजचे रेकॉर्ड मोडले आहेत. त्याने मुलाखातकाराची बोलतीच बंद केली आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

समाज माध्यमांवर सध्या लहान मुलांच्या मुलाखती, त्यांच्या हावभावाचे व्हिडिओ एकदम चर्चेत असतात. काही काही व्हिडिओत मुलं इतकी मजेदार प्रतिक्रिया देतात की ते पाहुन कोणीच त्यांचं हसणं थांबवू शकत नाही. काही जण हसून लोटपोट होतात. असाच एक व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. एक तरुण एका मुलाचा इंटरव्ह्यू घेतो. या मुलाखतीत तो त्याला तुझी गर्लफ्रेंड आहे का असा सवाल विचारतो. त्यावर हा मुलगा झटपट असं उत्तर देतो की त्या तरुणाची बोबडी वळते. त्याला पुढं काय विचारावं आणि काय बोलावं हेच सूचत नाही. पण हा व्हिडिओ पाहुन अनेकांची हसून हसून पुरेवाट लागते. काय देतो हा बिहारमधील छोटा मुलगा उत्तर?
काय आहे या व्हिडिओत
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ viral.vibes5 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यात एक तरुण, बिहारमधील मुलाला विचारतो, तुझी मैत्रिण, गर्लफ्रेंड नाही का? त्यावर क्षणाचाही विचार न करता हा मुलगा झटपट उत्तर देतो. नाही, मी बिहारी आहे. लडकी-वडकी नाही सांभाळत, थेट नवरा होतो. हा व्हिडिओ संपल्यावर त्यात एक कॅप्शन जोडल्या जाते. त्यात बिहार केवळ पती होण्यावरच विश्वास ठेवतो असे लिहिलेले असते.
View this post on Instagram
कमेंट्सचा पाऊस
या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर अनेक युझर्सने पसंती दिली आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया पण येत आहेत. एका युझर्सने लिहिले आहे की, आता मी पण थेट पत्नीच होणार, गर्लफ्रेंड होण्याच्या भानगडीत पडणार नाही. तर एकाने लिहिले आहे की मी पण असाच विचार करतोय भावा, पण मी बिहारी नाही. भावाचे भविष्य तर करिअरपेक्षा लग्नावर अधिक केंद्रीत असल्याचा चिमटा एका युझर्सने या व्हिडिओवर काढला. तर एकाने लिहिले आहे की वा बेटे, मौज कर दी. तर इतर ही अनेक युझर्सनी त्यावर दणकावून कमेंट केल्या आहेत.
डिस्क्लेमर : ही माहिती सोशल मीडियावरील पोस्टवर आधारीत आहे. टीव्ही 9 कोणत्याही दाव्याची पुष्टी करत नाही.
