AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : मैत्रिणींना नवरीला उचलून टाकायचं असतं स्विमिंग पूलमध्ये, पण घडलं भलतंच; ‘हा’ Video तुमचं मनोरंजन करेल!

लग्नसराई(Wedding)चा सध्या मोसम आहे. अशा स्थितीत वधू (Bride) आणि वरा(Groom)संबंधीचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातले अनेक व्हिडिओ तर गंमतीदार असतात. ते पाहून आपलं मात्र चांगलंच मनोरंजन होतं. सध्या असाच काही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Viral : मैत्रिणींना नवरीला उचलून टाकायचं असतं स्विमिंग पूलमध्ये, पण घडलं भलतंच; 'हा' Video तुमचं मनोरंजन करेल!
वधू/प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Feb 03, 2022 | 2:14 PM
Share

Wedding funny video : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही धक्कादायक आहेत तर काही इतके मजेदार असतात, की ते पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्याचबरोबर काही व्हिडिओंमध्ये मित्र-मैत्रिणींचे विनोदही पाहायला मिळतात. लग्नसराई(Wedding)चा सध्या मोसम आहे. अशा स्थितीत वधू (Bride) आणि वरा(Groom)संबंधीचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातले अनेक व्हिडिओ तर गंमतीदार असतात. ते पाहून आपलं मात्र चांगलंच मनोरंजन होतं. सध्या असाच काही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता, की एका वधुला तिच्या काही मैत्रिणी उचलून स्विमिंग पूलमध्ये फेकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यादरम्यान जे काही घडते ते पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलाच हशा पिकला आहे.

उचलून स्विमिंग पूलमध्ये टाकतात

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की वधू आणि तिच्या अनेक मैत्रिणी स्विमिंग पूलजवळ उभ्या आहेत. त्यांच्या मागे काही पुरुषही दिसतात. यादरम्यान, वधूच्या मैत्रिणी वधूला हात-पायांनी उचलून स्विमिंग पूलमध्ये टाकतात. लग्नात कोणते विधी चालले आहेत माहीत नाही, पण पुढच्या क्षणी जे काही घडते ते पाहून तुम्हाला खूप हसू येईल. मैत्रिणींनी नववधूला स्विमिंग पूलमध्ये टाकताच त्यातील एकीचा तोल गेला आणि नववधूसह सर्वजण जलतरण तलावात पडले.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की हे खूप मजेदार आहे. 30 जानेवारीला शेअर केलेला हा व्हिडिओ लोकांना गुदगुल्या करत आहे. आतापर्यंत 28 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

‘मग शत्रूची काय गरज?’

मजेशीर स्वरात कमेंट करताना एका यूझरने लिहिले आहे, की जेव्हा कुणाचे मित्र असे असतात, मग शत्रूची काय गरज? या गंमतीदार कमेंटनंतर यूजरने स्मायली टाकली आहे. त्याचवेळी आणखी एका यूझरने कमेंट करत लिहिले, की प्लॅनिंग नीट झाले नाही असे दिसते आहे. तसेच दुसर्‍या यूझरने कमेंट करत लिहिले, की ‘किस किस को अपने दोस्त और सहेलियां याद आ गईं.’

View this post on Instagram

A post shared by hepgul5 ?? (@hepgul5)

आणखी वाचा 

‘या’ बाळाला कशाचा राग आलाय बरं? हा Cute Viral Video पाहा आणि तुम्हीच सांगा

आई आणि मुलीच्या रंगलेल्या स्पर्धेत चिमुकलीला काय मिळतं गिफ्ट? धमाल उडवणारा Video Viral

Viral Video : या चिमुकलीचं Basketball कौशल्य पाहा; मग म्हणाल, उंचीनं नाही आत्मविश्वासानं जिंकता येतं मैदान

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.