AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुछ खास है हम सभी में, चर्चेत असलेली कॅडबरीची जाहिरात पाहिलीत का? पहाल तर म्हणाल, वाह वाह!

सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीविषयी, बातमीविषयी, व्हिडीओविषयी चर्चा सुरु असतात. अलीकडेच, कॅडबरी डेअरी मिल्कची (Cadbury Dairy Milk) एक नवीन जाहिरात सोशल मीडिया युजर्सकडून पसंत केली जात आहे.

कुछ खास है हम सभी में, चर्चेत असलेली कॅडबरीची जाहिरात पाहिलीत का? पहाल तर म्हणाल, वाह वाह!
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 11:28 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीविषयी, बातमीविषयी, व्हिडीओविषयी चर्चा सुरु असतात. अलीकडेच, कॅडबरी डेअरी मिल्कची (Cadbury Dairy Milk) एक नवीन जाहिरात सोशल मीडिया युजर्सकडून पसंत केली जात आहे. पण तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल, असं काय आहे, त्या जाहिरातीत की लोक त्याची चर्चा करत आहेत. या जाहिरातीचा 90 चं दशकाशी एक खास कनेक्शन आहे, त्यामुळेच ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Cadbury recreates iconic Dairy Milk advertisement from the 1990s with women cricketers, Video Viral)

काय आहे नवीन व्हिडीओ

अलीकडेच, कॅडबरी डेअरी मिल्कच्या एक नवीन जाहिरातीचा व्हिडिओ समोर आला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक महिलांचा क्रिकेट सामना सुरु आहे, यात एका महिला फलंदाजाच्या 99 धावा पूर्ण झाल्या आहेत, त्यानंतर तिने पुढच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला. हे पाहून एक प्रेक्षक, ज्याच्या हातात चॉकलेट आहे, तो खूप आनंदीत होऊन मैदानावर येतो आणि नाचू लागतो. त्याचवेळी, ती व्यक्ती क्रिकेटपटूला चॉकलेट खायला देते, जिने षटकार ठोकून शतक पूर्ण केलं होतं.

व्हिडीओ व्हायरल का होतोय?

खरं तर, कॅडबरीची ही नवी जाहिरात, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती 90 च्या दशकातील कॅडबरीच्या जाहिरातीची ट्विस्टेड आवृत्ती आहे. कॅडबरीची अशीच एक जाहिरात 90 च्या दशकात आली होती. ज्यामध्ये एक पुरुष क्रिकेटपटू क्रिकेट खेळत असतो आणि तोदेखील षटकार ठोकून शतक पूर्ण करतो. त्यानंतर एक महिला जी चॉकलेट खात असते, ती मैदानावर येऊन नाचू लागते, आणि त्या क्रिकेटपटूला चॉकलेट खायला देते. 90 च्या दशकातील या जाहिरातीची ट्विस्टेड कॉपी अनेकांना आवडली आहे. त्यामुळेच या नव्या जाहिरातीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहा

इतर बातम्या

VIDEO : मुलाने कबुतराला चमच्याने पाजलं पाणी, व्हिडीओ पाहून सुखावली नेटकऱ्यांची मनं!

Video: शेकडो कोटींच्या 15 गगनचुंबी इमारती 45 सेकंदात जमीनदोस्त, चीनचा हादरवणारा व्हिडीओ

कुत्रे किती हुशार असतात, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘काय भन्नाट व्हिडीओ आहे!’

(Cadbury recreates iconic Dairy Milk advertisement from the 1990s with women cricketers, Video Viral)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.