AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय रे देवा… ! असा समोसा ज्यात बटाटेच नाही, बाजारात आलाय नवा समोसा; त्यात काय घातलंय ते तर पहा..!

चॉकलेट मोमोज, गुलाबजामचे पराठे, फॅंटा मॅगी, ओरियो मॅगी, असे अनेक अजबगजब पदार्थांचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. त्यातच आता आणखी एका अतरंगी पदार्थाची भर पडली आहे.

काय रे देवा... ! असा समोसा ज्यात बटाटेच नाही, बाजारात आलाय नवा समोसा; त्यात काय घातलंय ते तर पहा..!
Image Credit source: Facebook
| Updated on: Apr 10, 2023 | 11:50 AM
Share

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या (lockdown) काळात घरी असताना लोकांनी अनेक पदार्थ स्वत: बनवायला सुरूवात केली. ही नवनव्या एक्सपेरिमेंट्सची नांदीच होती म्हणा ना ! खरंतर खाद्यपदार्थांवर नवनवे प्रयोग हे बऱ्याच काळापासून होत आहेत, पण त्यावेळी नवे प्रयोग करून पदार्थ आणखी चविष्ट बनवायचा प्रयत्न केला जायचाय पण आता काळ बदलला आहे आणि वेळही. आता खाद्यपदार्थांवर वेगळे प्रयोग तर केले जातात, पण ते खाण्यासारखे असतीलच याची काहीच गॅरेंटी नाही. उलट पदार्थांची चव बिघडण्याचीच शक्यता अधिक असते. याची अनेक उदाहरणं आपण आत्तापर्यंत पाहिली आहेत, त्यात आता आणखी एका प्रयोगाची आणि पदार्थाची भर पडली आहे. त्याचा व्हिडीओ (video) पाहून लोकही हैराण झाले आहेत.

समोसा हे आपल्यापैकी अनेकांचे पहिले प्रेम आहे. ऋतू कोणताही असो, पण हे खायला मिळालं तर आपला दिवस चांगलाच जातो. पण बदलत्या काळानुसार लोकांच्या या आवडत्या डिशसोबत अनेक अत्याचार झाले आहेत. आता हेच बघा ना, चॉकलेट मोमोज, गुलाब जामुन पराठे आणि ओरियो मॅगीनंतर आता भेंडी समोसा बाजारात आला आहे. हे बघून समोसाप्रेमींच्या मनात खळबळ माजली.

इथे पहा व्हिडीओ

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दिल्लीतील चांदनी चौकातील आहे. जिथे एक विक्रेता भिंडी समोसे विकताना दिसतो. या क्लिपमध्ये हा विक्रेता समोसा फोडून आत भरलेला मसाला दाखवतोय. पण त्यामध्ये बटाट्याऐवजी भेंडी भरलेली आहे. या व्हिडिओमध्ये तो विक्रेता दुकानदार सांगतो की, तो गेल्या 40 वर्षांपासून हे काम करत आहे आणि तो रोज रात्री दहा वाजता येथे दुकान थाटतो. ही क्लिप पाहिल्यानंतर, असा अतरंगी समोसा बनवणाऱ्याच्या हातांचे तुंबन घ्यायचे की त्यावर फटका द्यायचा, हे आता तुम्हीच ठरवा बाबा !

हा व्हिडिओ Food loverनावाच्या चॅनलने फेसबुकवर शेअर केला आहे. तो पाहिल्यानंतर लोक त्यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींना हा समोसा खूप आवडला, तर बरेच लोक होते ज्यांना हा पदार्थ अजिबात आवडला नाही. तुम्हालाही जर याचा स्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला चांदणी चौकातील भगीरथ पॅलेसमध्ये जावे लागेल, जिथे महादेव मंदिराच्या समोर या व्यक्तीचे दुकान आहे आणि हा अतरंगी समोसा चाखायला मिळू शकेल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.