Weird Food Combination : आजकाल काहीतरी वेगळे करण्याच्या नावाखाली रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते (Street vendor) खाद्यपदार्थांवर काहीतरी भलतेच विचित्र प्रयोग करत आहेत. लोकप्रिय पदार्थांवर हे असे प्रयोग करतात, ज्यामुळे तुम्हाला राग येईल. आजकाल दिल्लीतील एका रस्त्यावरील विक्रेत्याने समोसे (Samosa) बनवण्यासाठी बटाट्याऐवजी जिलेबी (Jalebi) भरली. हे पाहून लोकांचा संताप अनावर झालेला पाहायला मिळाला. यानंतर अनेकांनी सांगितले, की आता आमचा चांगल्या पदार्थांवरचा विश्वासच उडाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर इंटरनेट यूझर्स संतापले आहेत. जिलेबी हा पदार्थ देशातला सर्वात लोकप्रिय गोड पदार्थ आहे. तर समोसा सर्वात लोकप्रिय स्नॅक्स मानले जाते. या दोन आवडत्या पदार्थांमध्ये अशी गडबड होताना पाहून लोक संतप्त झाले आहेत. व्हिडिओ पाहून लोक म्हणत आहेत, की आता दोन्ही गोष्टी सोडण्याची वेळ आली आहे. व्हिडिओमध्ये दिल्लीतील एक विक्रेता समोसे बनवताना दिसत आहे.
समोसे भरण्यासाठी विक्रेता बटाट्याऐवजी कुस्करलेली जिलेबी वापरत असल्याचे तुम्ही पाहू शकता. यानंतर तो कढईत तळून घेतो. हे पाहून एकीकडे लोकांचा संताप व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे फूड ब्लॉगर ज्या प्रकारची कमेंटरी करत आहे, ते ऐकून तर तुम्हाला मजा येईल. सुरुवातीला, फूड ब्लॉगर म्हणतो, चांगल्या खाद्यपदार्थांवरचा विश्वास उठवण्यासाठी आपल्यासोबत आहेत दिल्लीचे शेफ कांडी… आता हा व्हिडिओ पाहा…
View this post on Instagram
हा व्हिडिओ radiokarohan नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यासोबत यूझरने कॅप्शन लिहिले, ‘हॅलो फ्रेंड्स… समोसे आणि जिलेबी दोन्ही सोडण्याची वेळ आली आहे.’ आम्ही तुम्हाला सांगतो, की हा व्हिडिओ खूप वेगाने पाहिला जात आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूझर्स रस्त्यावरील फेरीवाल्यांना शिव्या देताना दिसत आहेत.