बघता बघता जीव गेला… दोन धडधाकट तरूण, रील बनवण्याची हुक्की अन् एक चूक… पुढे काय घडलं?

आजच्या काळात सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. त्यात रीलचं फॅड म्हणजे जीवघेणा प्रकार. इन्स्टाग्रामवर रील टाकण्यासाठी तरुणांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. ही स्पर्धा कधी कधी जीवेघेणीही ठरते. राज्यातील दोन तरुणांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रील बनवण्याच्या नादात त्यातील एका तरुणाचा बघता बघता मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे.

बघता बघता जीव गेला... दोन धडधाकट तरूण, रील बनवण्याची हुक्की अन् एक चूक... पुढे काय घडलं?
accidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 7:17 PM

आजच्या काळात तरुणांमध्ये रील बनवण्याची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. ऊठसूठ रील बनवण्यात सर्वच मग्न असलेले दिसतात. विषयाचं काही बंधन नसतं, वेळेचं बंधन नसतं आणि जागेचंही बंधन नसतं. हातात मोबाईल घेतला की लागले रील बनवायला. काही लोक तर रील बनवण्यासाठी स्टंटही करतात. अन् मग होत्याचं नव्हतं होतं. रीलसाठी जीवघेणा खेळ केल्यामुळे अनेकांना तर मृत्यूनेही गाठले आहे. स्वत:ला फेमस करण्याच्या नादात हा सर्व घोळ होत असतो. दोन तरुणांनाही चालत्या बाईकवरून रील बनवणं चांगलंच महागात पडलं आहे.

सोशल मीडियाच्या काळात प्रत्येकजण स्वत:ला फेमस करण्याचा प्रयत्न करत आहे. खासकरून इन्स्टाग्रामवरून स्वत:ला फेमस करण्यासाठी तर लोक वेडेपिसे झाले आहेत. कुठेही घुसून आणि रील बनवण्यात लोग मश्गूल झाले आहेत. आपण कोणत्या ठिकाणी आहोत, तिथे रील बनवणं किती सुरक्षित आहे हे सुद्धा हे लोक पाहत नाहीत. आपल्या जीवाला तर धोका होऊ शकत नाही ना? याची काळजीही हे लोक घेत नाहीत. त्यामुळेच अनेकदा त्यांच्या जीवावर बेततं. आता हा व्हिडीओच पाहा. यात रील बनवण्याच्या नादात एका युवकाचा मृत्यू झाल्याचं दिसतंय.

रेलिंगवर बाईक आदळली

धुळे-सोलापूर हायवेवरची ही घटना आहे. या हायवेवरून दोन तरुण बाईकने चालेल होते. यावेळी पाठीमागे बसलेला तरुण व्हिडीओ रेकॉर्ड करायला लागला. त्यावेळी बाईक चालवणारा तरुणही व्हिडीओत दिसण्यासाठी कॅमेऱ्याकडे पाहू लागला. त्यावेळी ही भरधाव वेगाने येणारी ही बाईक हायवेला लावलेल्या लोखंडाच्या रेलिंगवर जाऊन आदळली. त्यात एका बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुसरा गंभीर जखमी झाला.

जीव धोक्यात घालणाऱ्यांची…

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @purvanchal51 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. त्यावर अनेकांच्या अनेक कमेंट आल्या आहेत. एकाने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. या देशात रील बनवण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्यांचीही काही कमी नाही, असं एका व्यक्तीने म्हटलं आहे. जेव्हा हे लोक जीवघेणा स्टंट करतात तेव्हा त्यांना कोणीच रोखू शकत नाही, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by purvanchal (@purvanchal51)

कार दरीत कोसळली

काही दिवसांपूर्वी एक भयंकर अपघात घडला होता. एक महिला बॅक गियरमध्ये गाडी चालवत होती. तेवढ्यात तिचा मित्र रील बनवत होता. त्यावेळी कार मागे गेली आणि अचानक कार 300 फूट दरीत कोसळली. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.