या हुकूमशाही देशात मासिक पाळीत सॅनेटरी पॅड वापरावर बंदी; पीरियड्समध्ये या वस्तूंचा वापर करण्याची महिलांवर वेळ
Sanitary Pad Banned : मासिक पाळीच्या काळात महिला सॅनेटरी पॅक, टॅपून वा मेंस्टूअल कपचा वापर करतात. पण या देशात तर महिलांची फार कुचंबणा सुरू आहे. या देशात पीरियड्स काळात महिलांना सॅनटेरी पॅड वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

जगातील विविध देशात वेगवेगळे कायदे चालतात. काही देशात एखाद्या गोष्टीवर बंदी असते तर दुसर्या देशात त्यावर बंदी नसते. त्याआधारे विविध देशात नियमातही बदल दिसतो. आता उत्तर कोरियाचंच उदाहरण घ्या ना. या देशात केव्हा कोणता नियम निघेल आणि कधी कुणाचा जीव जाईल काहीच नेम नसतो. उत्तर कोरियात किम जोंग हा हुकूमशहा आहे. तो आणि त्याची बहीण केव्हा काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. या देशात ना ना तऱ्हेचे अजब-गजब कायदे आहेत. या देशात आता महिलांना मासिक पाळीत सॅनिटरी पॅड लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतात सॅनिटरी पॅड मशीन सगळीकडे बसवण्याची मागणी जोर धरत असताना या देशातील हुकूमशाहने अजब फतवा काढला आहे.
पीरियड्समध्ये महिला या वस्तूंचा करतात वापर
पीरियड्सविषयी आता समाजात मोकळेपणाने बोलल्या जाते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पूर्वी शिवाशिव, कावळा आला, कावळा बसला असे सांकेतिक भाषेत सांगत होते. आता भारतीय समाजात बरेच बदल दिसत आहेत. मासिक पाळीमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. या काळात महिलांना बाहेर फिरणे, कार्यालयीन काम करताना अडचणींचा सामना करावा लागतो.
या काळात काळजी घेता यावी म्हणून बाजारात सॅनेटरी पॅड्स, मेंस्टूअल कप्स आणि पीरियड पँटी अशा अनेक गोष्टी असतात. या वस्तूंचा वापर करून महिला आरामशीर त्यांचे काम करू शकतात. पण किम जोंगच्या राज्यात सॅनेटरी पॅडसह इतर वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.
उत्तर कोरियाच्या बाजारात सुद्धा नाही सॅनेटरी पॅड
उत्तर कोरियाच्या बाजारात सुद्धा सॅनेटरी पॅड नाहीत. या ठिकाणी या गोष्टींवर बंदी असल्याने बाजारात त्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे या देशातील महिला आणि मुलींना या काळात कपड्यांचा वापर करावा लागतो. हे कपडे धुवून त्याचा पुन्हा वापर करण्यात येतो. किम जोग सरकारने सॅनिटरी पॅड उत्पादन आणि आयातीवर निर्बंध घातले आहेत.
