VIDEO: जगात अशक्य असं काहीच नाही! या दिव्यांग व्यक्तीचा व्हिडीओ पाहा, त्याच्या जिद्दीला कराल सलाम

दिव्यांग व्यक्तीच्या त्याच्या या सशक्तपणाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख 53 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 8 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, आणि त्याच्या कामाला सलाम केला आहे.

VIDEO: जगात अशक्य असं काहीच नाही! या दिव्यांग व्यक्तीचा व्हिडीओ पाहा, त्याच्या जिद्दीला कराल सलाम
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 7:38 PM

मुंबईः जगात दिव्यांग व्यक्तींसाठी आपल्याकडे वेगळी तरतूद आहे, ती तरतूद असली तरी त्यांच्या आयुष्यातील अडचणी काही केल्या कमी होत नाहीत. पण दिव्यांग व्यक्ती आयुष्य (Differently Abled Man) जगायचं थांबवत नाहीत, ते हसत खेळत जगत राहतात. तर काही जणांना त्यांची दया येते, तर काही जण त्यांची खिल्लीही उडवतात. दिव्यांगासाठी वेगळी तरतूद असली तरी त्यांना समानतेच्या (equality) भावनेतूनच आपण त्यांच्याकडे पाहिले पाहिजे, आणि हिच गोष्ट त्यांना हवी असते. समानतेच्या पातळीवर आपण समान असल्याचे ते मानतात आणि त्यासाठीच त्यांना वेगळं आहे असं समजू नये असंही त्यांना वाटतं. न्यूनगंडाने तर आपल्याकडे पाहूच नये अशी ही त्यांची भावना असते.

दिव्यांगांच्या अशी समानतेचे भावना असली तरी समाजाला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत नाही. समाजाची (Social) बघण्याची नजर त्यांच्याकडे बदलली नसली तरी त्यांनी स्वतःला अनेकवेळा सिद्ध केले आहे, आणि अनेक वेळा सिद्धही केले आहे की, आम्हीही सामान्य माणसासारखेच सक्षम आहोत.

‘त्याच्या’ धैर्याला सलाम

सोशल मीडियावर सध्या एका दिव्यांगाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्याच्याविषयी गौरवोद्गगार काढले आहेत. या व्हिडिओमध्ये एक अपंग व्यक्ती आहे, ज्याला हात नाहीत, पण ती व्यक्ती हातगाडीवर नूडल्स विकते आहे. हातगाडीवर ती व्यक्ती नूडल्स विकत असली, ती नूडल्सची रेसिपी बनवत असली तरी, तिला दोन्ही हात नाहीत, जे हात आहेत. तेही अपंग आहेत. तरीही ती व्यक्ती नूडल्स बनवत आहे. ज्यांना हात असतात अशी माणसं हाताच्या जोरावर कोणतंही काम करण्यास तयार होतात. मात्र या व्यक्तीने काम करण्याची पद्धत, कामाची व्याख्याच बदलून टाकली आहे. ज्या व्यक्तीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही त्याला सलाम नाही तर त्याच्या या धैर्यालाहा सलाम कराल.

मानसिक सशक्त

राहुल मिश्रा यांनी या व्यक्तीचा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसू शकतं की, त्या व्यक्तीचे दोन्ही हात सक्षम नाहीत मात्र तरीही ती व्यक्ती आपल्या हातगाडीवर नूडल्स बनवते आहे, त्यामध्ये मसाले टाकत आहे. त्यामुळे या दिव्यांग व्यक्तीचं काम बघून तुम्हाला नक्कीच वाटेल की, शारीरिक सशक्तीपणापेक्षा मानसिक सशक्त असणं किती गरजेचं आहे.

प्रचंड व्हायरल

दिव्यांग व्यक्तीच्या त्याच्या या सशक्तपणाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख 53 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 8 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, आणि त्याच्या कामाला सलाम केला आहे.

संबंधित बातमी

Video : हलगीच्या तालावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा ठेका, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Video : ‘राष्ट्रवादी पुन्हा’वर दत्तात्रय भरणे यांनी धरला ठेका, ‘मामां’ना कार्यकर्त्यांनी घेतलं ‘डोक्या’वर!

बाळाचं नाव सुचवा अन् सात लाख रूपये मिळवा, ‘बेबी नेमर’सारखी सुखाची नोकरी नाही!

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.