डिजिटल भिकारी! 4 लाख फॉलोअर्स, यूट्यूबवर लाईव्ह येऊन QR कोड दाखवून मागतो भीक, कमाईचा आकडा ऐकून बसेल धक्का
Viral Video: आजवर आपण मंदिरा बाहेर, रेल्वे स्टेशनवर, रस्त्याच्या सिग्नलवर अनेक ठिकाणी भिकारी पाहिले आहेत. पण तुम्ही कधी डिजिटल भिकारी पाहिला आहे का? नाही ना चला जाणून घेऊया ये प्रकरण नेमकं काय आहे.

तुम्ही रस्त्यावर, मंदिरात किंवा रेल्वे स्टेशनवर अनेक भिकारी पाहिले असतील. ज्यांच्या अंगावर फाटलेले कपडे असतात, हातात रिकामी वाटी घेऊन पैसे मागताना दिसतात. त्यांची अवस्था पाहून अनेकांना दया येते. पण तुम्ही कधी ऑनलाइन भीक मागणारा भिकारी पाहिला आहे का? होय, असा एक भिकारी आहे जो यूट्यूबवर लाइव्ह येऊन भीक मागतो. या ऑनलाइन भिकाऱ्याचे नाव आहे गौतम सूर्य. त्याच्या चॅनेलवर 5 लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
आतापर्यंत गौतमने त्याच्या चॅनेलवर 3.8 हजार व्हिडीओ अपलोड केले आहेत. त्याच्या या व्हिडीओला एकूण 26 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गौतम सूर्य दररोज 3-4 तास लाइव्ह येतो आणि स्क्रीनवर 2-3 QR कोड लावून लोकांकडून पैसे मागतो. त्याच्या चॅनेलच्या बायोमध्ये लिहिले आहे की, “एक दिवस मी माझे घर नक्की बांधेन, मग कोणीही मला इथून निघ जा असे म्हणणार नाही.”
View this post on Instagram
QR कोडद्वारे मागतो भीक
विशेष बाब म्हणजे तो कोणालाही फॉलो करत नाही, फक्त त्याच्या दुसऱ्या चॅनेललाच फॉलो करतो. आतापर्यंत त्याचे व्हिडीओ 26 कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. जेव्हा तो लाइव्ह येतो, तेव्हा एका वेळी 10 हजारांहून अधिक लोक त्याच्याशी जोडले जातात. लाइव्ह पाहताना लोक त्याला QR कोडद्वारे 1 रुपयापासून 100 रुपयेपर्यंत पेमेंट करतात. बहुतांश लोक त्याला 1 रुपया पाठवतात. जेव्हा कोणी पेमेंट करतो, तेव्हा तो त्या व्यक्तीचे नाव घेऊन थँक्यू म्हणतो आणि कोणत्या नंबरवरून किंवा नावाने पैसे आले ते सांगतो. गौतम दररोज किमान हजार रुपये कमावते असे म्हटले जात आहे.
गौतमने सांगितली त्याच्या कथा
एका व्हिडीओमध्ये गौतम सूर्य आपल्या संघर्षाची कहाणी देखील शेअर करतो. त्याने सांगितले की, जेव्हा 2-3 वर्षे त्याच्याकडे काम नव्हते, तेव्हा आयुष्यातील सर्वात कठीण काळाला तो सामोरे जात होता. तो म्हणतो, “मी तरुण आहे, पण तरीही घरी बेरोजगार बसलो होतो. रात्री जेव्हा बाबा 12:30 वाजता सायकलवरून कामावरून घरी यायचे आणि आमच्या नजरा मिळायच्या, तेव्हा मला खूप लाज वाटायची. या वयात माझ्या बाबांना सायकल चालवताना पाहणे माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे. म्हणूनच मी भीक मागतो.”
