ऐकावं ते नवलंच… डोनाल्ड ट्रम्प यांचा 10 सेकंदाचा खास व्हिडीओ तब्बल 48 कोटींमध्ये विकला

तुम्ही जगातील एकापेक्षा एक जास्त महाग सामान बघितलं असेल ( Video Clip Sold For 6.6 Million Dollar).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:02 AM, 2 Mar 2021
ऐकावं ते नवलंच... डोनाल्ड ट्रम्प यांचा 10 सेकंदाचा खास व्हिडीओ तब्बल 48 कोटींमध्ये विकला
Donald Trumps 10 Second Video

मुंबई : तुम्ही जगातील एकापेक्षा एक जास्त महाग सामान बघितलं असेल ( Donald Trumps 10 Second Video Clip Sold For 6.6 Million Dollar). महागड्या गाड्या, दागिने, कपडे यापासून ते खाण्याच्या पदार्थांपर्यंत सर्वकाही बाजारात उपलब्ध आहे. पण, काय तुम्ही कुठल्या अशा व्हिडीओबाबत ऐकलं आहे, ज्याला विकत घेण्यासाठी तब्बल 6.6 मिलीअल डॉलर म्हणजेच 48 कोटी 47 लाख 20 हजार 500 रुपये मोजावे लागले असेल. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल (Donald Trumps 10 Second Video Clip Sold For 6.6 Million Dollar).

नुकतंच एका आर्ट कलेक्टरने एक व्हिडीओ क्लीपला या किंमतीत विकलं जे बघून सर्वच हैराण झाले. त्यामुळे प्रत्येकाला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की हा व्हिडीओमध्ये असं काय आहे ज्यामुळे याला इतक्या मोठ्या किमतीत विकलं गेलं.

ऑक्टोबर 2020 मध्ये मियामी बेस्ड आर्ट कलेक्टर पाब्लो रोड्रिग्ज-फ्राईलने (Pablo Rodriguez-Fraile) 10 सेकंदाच्या या व्हिडीओ आर्ट वर्कसाठी तब्बल 67,000 डॉलर खर्च केले. ज्याला ते मोफत पाहू शकतात. त्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांनी या व्हिडीओला 6.6 मिलियन डॉलरमध्ये म्हणजेच 48 कोटी 47 लाख 20 हजार 500 रुपये विकला.

हे ऐकल्यावर सर्वांना या व्हिडीओमध्ये असं काय खास आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. रोड्रिग्ज-फ्राईलने विकलेल्या कम्प्युटर-जनरेटेड व्हिडीओमध्ये एक विशाल डोनाल्ड ट्रम्प जमिनीवर पडताना दिसत आहेत. त्यांचं शरीर घोषणांनी (Slogans) झाकलेलं आहे. डिजीटल आर्टिस्ट बिप्लबच्या (खरं नाव माईक विंकेलमॅन) या व्हिडीओला ब्लॉकचेन द्वारे प्रमाणित करण्यात आलं आहे.

कोरोना दरम्यान याच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ

ब्लॉकचेन एक डिजीटल सिग्नेचरच्या रुपात काम करतो जो हे प्रमाणित करतो की कुठल्या कामाचं मालक कोणा आहे आणि तो ओरिजीनल आहे. ही एक नवीन प्रकारची डिजीटल संपत्ती आहे. ज्याला नॉन-फंजिबल टोकनच्या (NFT) रुपात ओळखलं जातं. या दिवसांमध्ये कोरोना महामारी दरम्यान याच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कारण, असे कंटेंट पाहाणारे आणि विकत घेणारे ऑनलाईन वस्तूंवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी तयार राहतात. ब्लॉकचेन टेक्निक ट्रेडिशनल ऑनलाईन ऑब्जेक्टच्या प्रतिकूल वस्तूंना सार्वजनिक रुपात प्रमाणित करतात. ज्याला नेहमी री-प्रोड्युस केलं जाऊ शकतं ( Donald Trumps 10 Second Video Clip Sold For 6.6 Million Dollar).

एनएफटीच्या मार्केटप्लेस, ओपेनसीने सांगितलं की फेब्रुवारी ते आतापर्यंत या व्हिडीओची मासिक विक्री रेट 86.3 मिलियन डॉलर म्हणजेच 633 कोटी 54 लाख 98 हजार 750 रुपयांपर्यंत वाढलं आहे. ब्लॉकचेन डेटानुसार, गेल्या वर्षी याची मासिक विक्री 1.5 मिलियन डॉलर म्हणजेच 11 कोटी 01 लाख 18 हजार 750 रुपये होती. तर जानेवारी मध्ये ही 8 मिलियन डॉलर म्हणजेच 58 कोटी 72 लाख 84 हजार रुपयांपर्यंत पोहोचली. NFT ने त्या वस्तूंना लिस्ट करतात ज्यांचं आदान-प्रदान नाही केलं जाऊ शकत कारण ते युनिक आहे.

Donald Trumps 10 Second Video Clip Sold For 6.6 Million Dollar

संबंधित बातम्या :

“फोटोसाठीच अट्टाहास माझा”, लसीकरण करताना मास्क काढल्याने काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

नासाच्या मंगळयानासमोर मोठे संकट! मंगळावरील वादळात टिकू शकेल का Perseverance Rover?

Shocking Video! लाईव्ह रिपोर्टिंग करताना चोरट्याने रोखली पत्रकारावर बंदूक, पुढे काय झालं तुम्हीच पाहा