बाथरूमच्या ड्रेनेज पाईपमध्ये केसं अडकून चोकअप होतयं?… ‘ही’ पद्धत वापरून पहा, काही मिनिटांत होईल साफ
आपण बऱ्याचदा पाहतो की बाथरूमच्या जाळीत केस अडकलेले पाहतो. यामुळे पाणी साचू शकते. तर आजच्या लेखात तुम्हाला काही सोप्या घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला तुमच्या बाथरूमची ड्रेनेज सिस्टीम काही मिनिटांत स्वच्छ करण्यास मदत करतील.

आपण प्रत्येकजण आपलं घर स्वच्छ करत असतो. त्याचबरोबर घरातील टॉयलेट आणि बाथरूमही आपण नियमितपणे स्वच्छ करत असतो. पण अशातच या साफसफाईत मात्र अनेकदा काही छोट्या भागांकडे मात्र दुर्लक्ष होत असते. तर यामध्ये सर्वात जास्त समस्या असते ती म्हणजे केसांची. केस धुतले की गळणारे केस हे बाथरूमच्या ड्रेनेज जाळीत अडकतात आणि ते वेळीच उचले नाहीतर ते अडकुन बसतात.
तर हा केसांचा गुंता एकदा या ड्रेनेज च्या जाळीत आणि पाईपमध्ये अडकून बसले की पाईप चोकअप होते. त्यामुळे पाण्याचा निचरा नीटपणे होत नाही आणि पाणी साचू लागते. त्यात हा केसांचा गुंता आणि चोकअप पाईप नीट करण्यासाठी प्लंबरला बोलवून साफ करावे लागते. तर सतत प्लंबर बोलवून पैसे देऊन प्रत्येकाला जमत नाही. तर अशावेळेस हे केस अडकू नयेत आणि पाईपही साफ करता यावा यासाठी आजच्या या लेखात आपण काही सोप्या घरगुती उपाय जाणून घेऊयात जे काही मिनिटांत तुमच्या बाथरूम ड्रेनेज पाईप स्वच्छ करतील.
तुमच्या बाथरूमच्या ड्रेनमधून साचलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. उकळते गरम पाणी ड्रेनमध्ये ओता. यामुळे कचरा मोकळा होईल आणि ड्रेन साफ होईल.
बाथरूममधील ड्रेन साफ करण्यासाठी तुम्ही प्लंजर देखील वापरू शकता. प्लंजरचा रबराचा भाग ड्रेनवर घट्ट ठेवा, नंतर वर-खाली पंप करा. असे सतत करत रहा अशाने ड्रेन पूर्णपणे स्वच्छ करा. तुम्हाला हात वापरण्याची गरज नाही.
बाथरूममधील ड्रेन स्वच्छ करण्यासाठी 1 कप व्हाइट व्हिनेगर ड्रेन पाईपमध्ये टाका आणि अर्धा मिनिटाने 1 कप बेकिंग सोडा टाका. आता 5-10 मिनिटे वाट पाहून पाईपात गरम पाणी टाका. त्यामुळे केमिकल रिॲक्शननंतर जमा झालेले केस निघुन जाण्यास मदत होईल.
याव्यतिरिक्त, हातमोजे घाला. नंतर, ड्रेन उघडा आणि तुमच्या हातांनी कचरा काढा. यामुळे तुंबलेला ड्रेन साफ करणे सोपे होईल.
लक्षात ठेवा या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करूनही सुरूवातीला लगेच सगळे केस ड्रेनेज पाईपमधून निघतीलच असे नाही. मात्र साधारण तुम्ही 2-3 वेळा हे उपाय केल्यानंतर ड्रेनेज पाईप स्वच्छ होण्यास मदत होईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
