Video: धान्य निवडण्यासाठी शेतकऱ्यांच्या कारभारणींचा जुगाड, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, आमचा बळीराजा ग्रेट आहे

आपला शेतकरी राजा रोज काही ना काही जुगाड करत असतो. जेणेकरून त्यांचे काम सोपं होईल. अलिकडच्या काळातही एका शेतकरी कुटुंबाचा जुगाड इंटरनेटच्या जगात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video: धान्य निवडण्यासाठी शेतकऱ्यांच्या कारभारणींचा जुगाड, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, आमचा बळीराजा ग्रेट आहे
धान्य स्वच्छ करण्यासाठी देसी जुगाड
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 1:11 PM

आजच्या काळात लोक ‘जुगाड’ वापरून अनेक मजेदार गोष्टी बनवतात. कधीकधी या गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण होते. इतकंच नाही तर मोठमोठे दिग्गजही हे पाहून आश्चर्यचकित होतात. जुगाड बनवलेल्या गोष्टींचे व्हिडिओही सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. सध्या एका जुगाडचा व्हिडिओ समोर आला आहे. हे पाहिल्यानंतर भल्याभल्या शास्त्रज्ञांनाही धक्का बसेल. (Farmer cleaned his grain through desi jugaad video goes viral on social media)

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, आपला शेतकरी राजा रोज काही ना काही जुगाड करत असतो. जेणेकरून त्यांचे काम सोपं होईल. अलिकडच्या काळातही एका शेतकरी कुटुंबाचा जुगाड इंटरनेटच्या जगात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला या आयडिया सुचतात कशा?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, थ्रेशर नसताना शेतकरी महिलांनी देसी जुगाडची युक्ती अवलंबली आहे. यासाठी महिला कूलरच्या वर ठेवलेल्या डब्यांमध्ये धान्य टाकलं, त्या डब्याला एक बोक पडलेलं आहे, त्यातून धान्य खाली पडतं, ते कुलरसमोरुन जातं, त्यामुळे त्यातून आपोआप कचरा बाहेर फेकला जातो, आणि दाणे खाली पडतात. यामुळे धान्य स्वच्छ करण्याचं काम काही वेळातच पूर्ण होतं.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by JUGAAD (@jugaadu_life_hacks)

या जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. या जुगाडचे अनेकांनी कौतुक केले आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘या जुगाडद्वारे आपण आमचा बराच वेळ वाचवू शकतो.’ तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘आमच्या शेतकरी बांधवांना हे देसी जुगाड कसे वापरायचे हे चांगलेच माहित आहे.’ अनेकांनी इमोजीजद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

हा जुगाडी व्हिडिओ इंस्टाग्रामवर jugaadu_life_hacks नावाच्या अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्याने कॅप्शन लिहिले, ‘या जुगाडमध्ये तुम्हाला काय कळालं.’ बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला शेकडो लाईक्स आणि हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही पाहा:

Video: धो-धो कोसळणाऱ्या धबधब्यातून आई-मुलाला वाचवलं, वनाधिकाऱ्यांच्या शौर्याचं सोशल मीडियावर कौतुक, हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडीओ

Viral Video: प्राण्यांची चेष्टा करण्याआधी शंभरदा विचार करा, नाहीतर काय होतं पाहा…

 

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.