Video : निघता निघेना पील ऑफ मास्क; यूझर्स म्हणाले, पुन्हा अशी चूक करू नकोस..!

Video : निघता निघेना पील ऑफ मास्क; यूझर्स म्हणाले, पुन्हा अशी चूक करू नकोस..!
पील ऑफ मास्क

सुंदर (Beautiful) दिसण्यासाठी लोक चेहऱ्याला काय लावतात. यासंबंधीचे व्हिडिओ(Video) ही व्हायरल (Viral) होत असतात आणि आपण ते एन्जॉयही करत असतो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय, जो पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.

प्रदीप गरड

|

Jan 24, 2022 | 9:00 AM

Funny Video of Girl : सुंदर (Beautiful) दिसण्यासाठी लोक चेहऱ्याला काय लावतात. यासंबंधीचे व्हिडिओ(Video) ही व्हायरल (Viral) होत असतात आणि आपण ते एन्जॉयही करत असतो. मुले सुंदर दिसण्यासाठी सर्व प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात, परंतु मुली मुलांपेक्षा अधिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतात. तुम्ही पाहिलं असेल की लोक मुलतानी माती, महागड्या ब्रँडचे फेशियल, मसाज आणि मास्क वापरतात ज्यामुळे त्यांचा चेहरा चमकतो. मात्र कधीकधी त्याचा अतिरेक होतो आणि मग आपल्याला त्याचे परिणामही भोगावे लागतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय, जो पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.

खूप वेदना झाल्या

सुरुवातीला मुलीनं चेहऱ्यावर पील ऑफ मास्क वापरला, पण तो काढताना तिला नक्कीच आजीची आठवण झाली असेल. जेव्हा मुलीच्या चेहऱ्यावरून मास्क काढला जाऊ लागला तेव्हा तिला खूप वेदना झाल्या. ती मुलगी रडत होती. घरातल्या काही सदस्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रडून रडून मुलीचे झाले हाल

व्हिडिओमध्ये दिसत आहे, की मुलीनं सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर पील ऑफ मास्क लावला आहे. हीच तिच्यासाठी सर्वात मोठी समस्या बनली. कारण थोडा वेळ तसाच राहू दिल्यानंतर जेव्हा मुलीनं मास्कची साल काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती चेहऱ्यावर चांगलीच अडकली होती. तो मास्क मुलीकडून काढला जात नव्हता, त्यामुळे कुटुंबीयांनी तो काढण्यास मदत केली. यावेळी रडून रडून मुलीचे मात्र हाल झाले.

इन्स्टाग्राम पेजवर अपलोड

व्हिडिओ पाहून असं दिसतं, की बऱ्याच अडचणींनंतर, प्रयत्नांनंतर तो मास्क मुलीच्या चेहऱ्यावरून काढण्यात आला. punjabi_industry या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ खूप वेगानं पाहिला जात आहे आणि लोक मुलीला पुढच्या वेळी अशी चूक करू नको, असा सल्ला देत आहेत.

Video : Nach Meri Raniवर आई-मुलाच्या जोडीचा जबरदस्त डान्स, नोरा फतेहीही होईल प्रभावित

Rat and Snake fight : पिल्लाला वाचवण्यासाठी उंदरानं घेतला सापालाच चावा, Video Viral

Viral Photos : उद्योगपती हर्ष गोयंकांनी शेअर केले बिस्किटांचे दोन फोटो, पोस्ट पाहून तुम्हालाही येईल हसू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें