नवरदेवाच्या गळ्यात “हे भली मोठी नोटांची माळ”, फोटो व्हायरल!
इतक्या नोटा जोडलेल्या केल्या आहेत की माळेशिवाय दुसरं काही दिसत नाही.

लग्नाचे अनेक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी नवरीचे, कधी नवरदेवाचे, कधी त्यांचे डान्सचे, कधी कुठली दुर्घटना घडली असेल तर त्याचे. कधी काही चांगलं घडलं तर त्याचे. नुसत्या “लग्न” या विषयाशी निगडित असणारे अनेक अकाउंट सोशल मीडियावर आहेत. कुठून ना कुठून हे किस्से व्हायरल होतच असतात. असंच एक भन्नाट प्रकरण समोर आलाय. ज्यात नवरदेवाला हे भली मोठी माळ घालण्यात आलीये. साधीसुधी नाही पैशांची!
फोटोत एक नवरदेव स्टेजवर उभा आहे आणि त्यात दुसरं कुणीही दिसत नाही, फक्त त्याच्या नोटांची माळ दिसतीये.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील आहे. यात एक नवरदेव आपल्या लग्नात नोटांचा हार घातलेला दिसतोय.
या नोटेच्या माळेतील खास गोष्ट म्हणजे यात अनेक अनेक नोटा आहेत. इतक्या नोटा जोडलेल्या केल्या आहेत की माळेशिवाय दुसरं काही दिसत नाही. नवरदेवाने जे परिधान केलंय तेसुद्धा इथे दिसत नाहीये.
नोटांच्या माळेमुळे नवरदेवाचा केवळ चेहराच दिसतो. मात्र, या माळेत किती नोटा जोडण्यात आल्या आहेत, याची माहिती मिळू शकलेली नाही.
सोशल मीडियावर एका युझरने लिहिले की, हा सर्व शो आहे, लग्न साधेपणाने केले पाहिजे, तर दुसऱ्याने लिहिले की, ही माळ नेकलेस नाही तर बेड कव्हरसारखी दिसते. काही लोकांनी या सगळ्याचा निषेध करत, अशा प्रकारची पैशाची उधळपट्टी योग्य नाही असं म्हटलंय.
सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. वर-वधूचे मजेशीर फोटो अनेकदा व्हायरल होत असले तरी नोटांच्या माळेचा हा असा फोटो पाहून लोक चक्रावून गेलेत.
