Video : माधुरीलाही लाजवेल असा डान्स, ‘चोली के पीछे’वर काकींचा डान्स व्हिडीओ नक्की पाहा
एक हळदी कार्यक्रमातील वहिनींच्या गटाने केलेला जबरदस्त नृत्य सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "चोली के पीछे" या गाण्यावर त्यांच्या परफॉर्मन्सने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांच्या उत्साहाने आणि परफेक्ट स्टेप्सने नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लग्नाच्या उत्सवात या नृत्याने रंग भरला आहे.

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मीलन नव्हे, तर हा दोन कुटुंबांचा उत्सव मानला जातो. या सोहळ्यात गाणं, डान्स आणि मजा मस्ती यातील कशाचीच कमतरता नसते. सध्या सोशल मीडियावर असाच एका लग्न सोहळ्यातील व्हिडीओ अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या हळदीच्या कार्यक्रमात वहिनींच्या एका ग्रुपने आपल्या जबरदस्त डान्सने सर्वांना थक्क केले आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल होत आहे की अनेक जण तो शेअर करत आहेत.
हळदी कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल
आपल्याकडे लग्न म्हटलं की त्याची तयारी कितीतरी महिन्यांपूर्वी सुरु होते. लग्नात आपला डान्स भारी असला पाहिजे, यासाठी प्रत्येकजण मेहनत करत असतो. प्रत्येकजण लग्नाच्या दिवसापर्यंत आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी उत्सुक असतो. अशाच एका लग्नसोहळ्याच्या हळदी कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल असतो. या व्हिडीओत दोन महिलांच्या डान्स सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
डान्ससाठी प्रचंड मेहनत
या व्हिडीओत दोन महिला हळदीच्या कार्यक्रमादरम्यान ‘चोली के पीछे’ या बॉलिवूडच्या गाजलेल्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या दोघींही हुबेहुब त्या गाण्यातील कलाकारांप्रमाणेच नाचताना दिसत आहे. यावेळी त्यांच्या आनंद, डान्समधील एनर्जी आणि उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले इतर नातेवाईक आणि महिला टाळ्या वाजवून, शिट्ट्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या डान्समधील प्रत्येक स्टेपने त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातून त्यांनी डान्ससाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
हा व्हिडीओ didsupermoms_riddhitiwari_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यावेळी एका युझरने असे लिहिले आहे की “यासाठी वहिनींनी नक्कीच पीएचडी केली असेल!” तर दुसऱ्याने असं म्हटलं की “हा नुसती परफॉर्मन्स नाही, ही तर कला आहे”. आणखी एकाने कमेंट करत ” काय बीट पकडली आहे, जणू काही गाणं त्यांच्यासाठीच बनलं आहे!” अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. या वहिनींच्या डान्समुळे खऱ्या अर्थाने हळदीला रंग चढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धमाल उडवून दिली आहे.
