Video: झोक्यावरुन उडी आणि थेट पायजम्यात, हरहुन्नरी लोकांचे कर्तब पाहून नेटकरी अवाक

व्हिडीओच्या पहिल्या भागात एक व्यक्ती झोका घेतो आणि त्याच्या समोर 2 व्यक्ती पायजमा घेऊन उभ्या आहे, झोक्यावरचा व्यक्ती फ्लिप मारतो आणि थेट पायजम्यात शिरतो.

Video: झोक्यावरुन उडी आणि थेट पायजम्यात, हरहुन्नरी लोकांचे कर्तब पाहून नेटकरी अवाक
व्हिडीओच्या पहिल्या भागात एक व्यक्ती झोका घेतो आणि त्याच्या समोर 2 व्यक्ती पायजमा घेऊन उभ्या आहे, झोक्यावरचा व्यक्ती फ्लिप मारतो आणि थेट पायजम्यात शिरतो.

प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका इंटरनेटवर कायम सक्रीय असतात. त्यामुळेच दररोज ते काही ना काही मजेदार गोष्टी पोस्ट करत असतात. त्यांच्या या पोस्ट नेटकऱ्यांसाठी मेजवाणीसारख्याच असतात. कधी पोट धरुन हसवणारे जोक, फोट, व्हिडीओ तर कधी प्रेरणा देणारे संदेश. लोकांचं मनोरंजन करण्याचा सगळा मसाला ते कायम सर्व्ह करत असतात. आता त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो तुम्हाला विचार करण्यास भाग पाडेल. (harsh goenka retweet man stunts by jumping from the swing viral funny video)

या व्हिडीओमध्ये जगातील भन्नाट लोकांचे कारनामे दाखवण्यात आले आहेत. व्हिडीओच्या पहिल्या भागात एक व्यक्ती झोका घेतो आणि त्याच्या समोर 2 व्यक्ती पायजमा घेऊन उभ्या आहे, झोक्यावरचा व्यक्ती फ्लिप मारतो आणि थेट पायजम्यात शिरतो. व्हिडीओच्या दुसऱ्या पार्टमध्ये एक व्यक्ती कुठलंही कंपस न घेता हातानेच बोर्डवर परफेक्ट वर्तुळ काठतो, तिसऱ्या भागात पिझ्झा कर्मचारी अगदी फटाफट पिझ्झा स्लाईस करताना दिसतो. त्यानंतर लहान मुलगा फूटबॉल मॅचमध्ये आपले कर्तब दाखवताना दिसतो.

पाहा व्हिडीओ:

@hussain_tarana या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, जो व्हिडीओ हर्ष गोयंका यांनी रिट्वीट केला आहे. या व्हिडीओतून जगभरात किती अफलातून लोक आहे, हे कळतं. बरेच लोक फक्त आयुष्यात येतात, काम करतात आणि जगातून निघून जातात. मात्र, काहीतरी भन्नाट करणारे लोकच खरं आयुष्य जगतात हे या व्हिडीओतून कळतं.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने लिहलं, याला म्हणतात टायमिंगचा खेळ, तर दुसऱ्याने लिहलं, खरंच खूप भारी आहे, लोक सोशल मीडियावर खूप लवकर फेमस होतात. 15 सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाकांनी पाहिलं आहे. हेच नाही तर अनेकांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरुन पोस्टही केला आहे.

हेही पाहा:

Video: वरमाला टाकताना वधूची उंची कमी पडली, तेव्हा वराने जे केलं, ते पाहून लोकांनी त्याचं कौतुक केलं!

घसरगुंडीवरचा स्टंट महागात, लोकांना हसू आवरेना, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना बालपण आठवलं!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI