भ्रमात राहू नका, केव्हा पण होऊ शकतो ‘गेम’! हनीट्रॅपची ती कहाणी… ‘हसिना’ अशी करते कमाई
Honeytrap : या डिजिटल युगात तुम्हाला कोण, केव्हा आणि कसं 'अरेस्ट' करेल हे काही सांगता येत नाही बुवा! तुम्ही एकदा या कॅमेऱ्याच्या टप्प्यात आला की गेम झालाच म्हणून समजा. नात्यात तर तुमचा वाकड्यात पाय गेला, पाय घसरला की तिसरा कसा फायदा घेतो याची ही कथा...

तर कोणत्याही नात्यात प्रेम, सन्मान, विश्वास आणि इमानदारी गरजेची असते. ऑनलाईन डेटिंगमुळे अनेकदा नाते हे शरीरापुरतेच मर्यादित राहते. त्याला मनाची तहान काही भागवता येत नाही. विश्वास आणि इमानदारी हे डिक्शनरीतील शब्द झाले आहेत. या डिजिटल युगात तुम्हाला कोण, केव्हा आणि कसं ‘अरेस्ट’ करेल हे काही सांगता येत नाही बुवा! तुम्ही एकदा या कॅमेऱ्याच्या टप्प्यात आला की गेम झालाच म्हणून समजा. नात्यात तर तुमचा वाकड्यात पाय गेला, पाय घसरला की तिसरा कसा फायदा घेतो याची ही कथा…
‘गेम’ कधी होईल याचा काही ‘नेम’ नाही
तर तुम्ही जर प्रेमात पडला असाल आणि जादा हुशार असाल तर तुमच्यावर चोरावर मोर होऊ शकतो. सध्याच्या डिजिटल युगात मुली स्मार्ट झाल्या आहेत. बॉयफ्रेंड अथवा नवरा ओव्हरस्मार्ट असेल तर त्याला जमिनीवर आणण्याचे काम या मुली, दुसऱ्या मुलींकडून करून घेतात. त्यासाठी मग हेरगिरी करणाऱ्या मुली चांगली रक्कम वसूल करतात. त्यामुळे भ्रमात राहू नका, केव्हा पण गेम होऊ शकतो. तुम्ही जर फ्लर्ट करत असाल अथवा प्रेयसीला फसवत असाल तर तुमचं काही खरं नाही.
कोण आहे ती ललना
तर सोशल मीडियावर सक्रिय असलेली 29 वर्षांची इन्फ्लुएंसर लाना मॅडिसन ही स्वतःला रिअल लाईफ हनी ट्रॅप असल्याचा दावा करते. ती एक यशस्वी मॉडल सुद्धा आहे. ती प्रियकर अथवा नवऱ्याचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी त्यांच्या प्रेयसी आणि बायकांकडून मोठी रक्कम वसूल करते. तिच्या संपर्कात अनेक महिला असल्याचे तिने सांगितले आहे.
महिला करतात संपर्क
लाना म्हणते की तिला अनेक महिला संपर्क करतात. त्या तिला बॉयफ्रेंड आणि नवऱ्याचा मोबाईल क्रमांक, सोशल मीडियावर खात्याची सर्व माहिती देतात. मग लाना त्या पुरुषासोबत संपर्क साधते. त्याच्याशी फ्लर्ट करते. तो जर हेल्थी फ्लर्ट करत असेल तर ती ते नॉर्मल घेते. पण एखादा पुरूष जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल. तिचे फोटो मागत असेल. व्हिडिओ कॉलचा आग्रह करत असेल तर मग पुढे जे कांड होते, त्याला अर्थातच तो पुरूष जबाबदार असतो. या कामासाठी ती साधारण 4.15 लाख रुपये घेते. या दरम्यान जे स्क्रीन शॉट आहेत ते प्रेयसी आणि पत्नीच्या हाती सोपवले जातात.
