#MonkeyvsDog ट्रेंड (Trend) काही कमी होत नाही आहे. महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या बीड (Beed) जिल्ह्यातील एका गावातील ही घटना संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय बनलेला असतानाच आता या घटनेच्या परस्परविरोधी व्हिडीओ (Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ देखील बीडमधील असल्याची कूजबूज सुरु आहे. एकीकडे माकडांनी २५० कुत्र्यांच्या पिल्लांचा खात्मा केल्याची चर्चा सुरु आहे. त्यावरुन शेकडो मीम्सही (Meme) तयार झालेत. ट्वीटरवर Monkey vs Dog हा हॅशटॅगही (Hashtag) ट्रेन्ड होतो आहे. तर दुसरकडे इन्टाग्रामवरील एका वेरीफाईड प्रोफाईलवरुन कुत्र्याच्या पिल्लाला कुरवाळणाऱ्या, त्याच्यावर माया करणाऱ्या एका माकडाचा व्हिडीओ आता व्हायरल (Video Viral) होतोय.