AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayana Murthy : रोज 12 तास काम करण्यासाठी नारायण मुर्तींनी दिलं मोदींच्या 100 तासांचं उदहारण, त्यावर युजर म्हणाले…

Narayana Murthy : कामाच्या तासांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नारायण मूर्ती यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 100 तास काम करण्याचं उदहारण दिल. त्यावर नेटीझन्स खूप वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाले आहेत.

Narayana Murthy : रोज 12 तास काम करण्यासाठी नारायण मुर्तींनी दिलं मोदींच्या 100 तासांचं उदहारण, त्यावर युजर म्हणाले...
narayana murthy
| Updated on: Nov 18, 2025 | 3:40 PM
Share

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा 72 तास वर्क-वीकच समर्थन केलं आहे. यावेळी त्यांनी चीनच्या प्रसिद्ध आणि वादग्रस्त ‘9-9-6’ मॉडलच उदहारण दिलय. यात कर्मचारी सकाळी 9 ते रात्री 9 असं आठवड्यातील 6 दिवस काम करतात. रिपब्लिक TV ला दिलेल्या इंटरव्यूमध्ये नारायण मुर्ती म्हणाले की, ‘कठोर मेहनतीशिवाय कुठलाही देश किंवा समाजाची प्रगती होत नाही’ मुर्ती म्हणाले की, ‘लाइफ बनवली पाहिजे, त्यानंतर वर्क-लाइफ बॅलन्सची चिंता केली पाहिजे’

मुर्ती यांची Catamaran कंपनी आहे. त्यांच्या स्टाफने चीनच्या वेगवेगळ्या शहरात राहून त्यांचं वर्क कल्चर समजून घेतलं. चीनमध्ये 9-9-6 अशी मानसिकता असल्याचा दावा त्यांनी केला. यात आठवड्याभराच्या कामाचे एकूण 72 तास होतात. नारायण मुर्ती यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उदहारण दिलं. ते आठवड्याचे 100 तास काम करतात असा दावा त्यांनी केला. मेहनत आणि स्मार्ट वर्कच कमकुवत वर्गासाठी संधी निर्माण करु शकतो.

नेटीझन्सच्या इंटरेस्टिंग कमेंट

मुर्ती यांच्या स्टेटमेंटची इंटरनेटवर भरपूर चर्चा आहे. अनेक लोक म्हणाले की, ‘भारत आधीच ट्रॅफिक, महागाई आणि कमी सॅलरीच्या समस्येशी झुंज देतोय. अशावेळी 72 तास वर्क-वीक शक्य नाही’ एका युजरने लिहिलय ‘आधी चीन सारखं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सॅलरी द्या. मग 996 बद्दल बोला’ दुसऱ्या युजरने लिहिलय की, ‘भारतात 72 तास काम नको, पण असा पगार पाहिजे ज्यामध्ये तुमचं भाडं, फी आणि महिन्याच्या किराण्याचा खर्च निघेल’ अनेकांनी लिहिलय की ‘चीनच 996 मॉडल संपुष्टात येणं, त्यातूनच या मॉडलच्या कमतरता दिसून येतात. कर्मचाऱ्यांचे बर्नआऊट आणि मानसिक तणावाची प्रकरणं वाढली आहेत’

मॉडर्न स्लेवरी’ सुद्धा म्हणतात

चीनमध्ये आता 996 वर्क कल्चरवर कायदेशीर बंदी आहे. कारण यामुळे बर्नआऊट, स्वास्थ समस्या आणि वर्क-लाइफ असंतुलन वाढतय. टीकाकार याला ‘मॉडर्न स्लेवरी’ सुद्धा म्हणतात. या विरोधात अनेक युवक ‘लाइंग फ्लॅट’ आंदोलनाचा भाग बनले. कमी तणाव आणि संतुलित जीवनाची मागणी लाइंग फ्लॅटद्वारे होते. आता मुर्ती यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा वर्क-लाइफ बॅलन्सची चर्चा सुरु झाली आहे. आर्थिक विकासासाठी जास्त तास काम करणं आवश्यक आहे की, चांगली सिस्टिम, सॅलरी आणि टेक्निक सोल्यशून आहे?

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.