धक्कादायक ! शीतपेय दिले नाही म्हणून गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक ! शीतपेय दिले नाही म्हणून गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल
cctv footage

शीतपेय दिले नाही म्हणून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील घनसावंगी शहरातील एका हॉटेलमध्ये घडली आहे. (Jalna hotelier beaten cctv footage viral)

prajwal dhage

|

Apr 10, 2021 | 12:29 AM

जालना : शीतपेय दिले नाही म्हणून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील घनसावंगी शहरातील एका हॉटेलमध्ये घडली आहे. गुंडांनी या हॉटेलच्या मालकाला बेदम मारले आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न झालेल्या हॉटले व्यावसायिकाचे नाव देवराम मेहता (Devram Mehta) असल्याचं सांगण्यात येतंय. (Jalna Ghansawangi hotelier Devram Mehta beaten by goons CCTV footage goes viral)

नेमका प्रकार काय ?

घनसावंगी येथील एका हॉटेलसमोर काही गुंड थांबले होते. त्यांनी या हॉटेल मालकाला शीतपेय देण्यात सांगितले. मात्र, मालकाने ते न दिल्यामुळे गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे गळ्यात पाईप टाकून जिवे मारण्याचादेखील प्रयत्न या गुंडांनी केला. देवराम मेहता असं या हॉटेल व्यावसायिकाचं नाव आहे.

गुंडाकडून हॉटेल मालकाला मारहाण होत असल्याचे लक्षात येताच, येथे बाकीच्या लोकांनी धाव घेतली. तसेच गुंडासोबत असलेल्या इतर साथिदारांना आवरण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. मात्र, गुंड आणि त्याच्या साथिदारांनी कोणालाही दात न देता हॉटेल मालकाला जबर मारहाण केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसे स्पष्टपणे दिसत आहे.

चार जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, मारहाण करुन हॉटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरु असून, या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

कोरोना लस घ्या, फ्री बियर मिळवा; ‘या’ शहरात सुरु आहे बंपर ऑफर

VIDEO : लहान मुलांमध्ये तुफान हाणामारी, तुम्ही देशी WWE बघितलं का?, बघितल्यावर पोट धरुन हसाल

Video | प्रेयसीची आठवण आली, अन् तरुण हमसून हमसून रडायला लागला, नेटकरी म्हणतायत हेच खर्ऱर्रर्ऱ प्रेम, व्हिडीओ पाहाच

(Jalna Ghansawangi hotelier Devram Mehta beaten by goons CCTV footage goes viral)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें