#JanataCurfew : दोन वर्षांपूर्वी याच दिवशी…; एका क्लिकवर पाहा, पोट दुखेपर्यंत हसवणारे Memes अन् Videos

JanataCurfew completed two years : 22 मार्च 2020चा दिवस प्रत्येक भारतीयाला चांगलाच आठवत असेल. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशव्यापी 'जनता कर्फ्यू' (Janata Curfew) जाहीर केला होता.

#JanataCurfew : दोन वर्षांपूर्वी याच दिवशी...; एका क्लिकवर पाहा, पोट दुखेपर्यंत हसवणारे Memes अन् Videos
जनता कर्फ्यूला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शेअर होतायत मीम्सImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 2:58 PM

JanataCurfew completed two years : 22 मार्च 2020चा दिवस प्रत्येक भारतीयाला चांगलाच आठवत असेल. दोन वर्षांपूर्वी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशव्यापी ‘जनता कर्फ्यू’ (Janata Curfew) जाहीर केला होता. त्यांच्या एका आवाहनावर लोकांनी स्वतःला आपल्या घरात कैद केले. कोरोनासारख्या अदृश्य शक्तीशी लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी आणि आघाडीच्या योद्धांच्या सन्मानार्थ सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटे टाळ्या वाजवण्यात आल्या. आज या जनता कर्फ्यूला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. कोरोनाच्या छायेत या कर्फ्यूच्या अनेक मजेदार आठवणी लोकांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. तुमच्याही काही आठवणी असतील, ज्या तुम्ही कधीही विसरणार नाही. जनता कर्फ्यूनंतर, लॉकडाऊनपासून ते अनलॉकपर्यंत, देशातील प्रत्येक नागरिकाने या कठीण जीवनाची परीक्षा यशस्वीपणे पार केली आहे. जनता कर्फ्यूच्या वर्षपूर्तीचीही बातमी आम्ही बातमी केली होती. त्यावेळीही मीम्स शेअर करण्यात आले होते.

हॅशटॅगसह शेअर करतायत जुन्या आठवणी

आता गोष्टी हळूहळू रुळावर येत आहेत. पूर्वीप्रमाणेच शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. लोक कोरोनासोबत जगायला शिकले आहेत. दरम्यान, ट्विटरवर लोक #JanataCurfew या हॅशटॅगसह त्याच्याशी संबंधित जुन्या आठवणी शेअर करत आहेत. एक नजर टाकूया निवडक ट्वीट्सवर…

व्हिडिओंनी केले होते मनोरंजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर दोन वर्षांपूर्वी जनता कर्फ्यू लागू केला होता, ही एक प्रकारे लॉकडाऊनची चाचणी होती. ती यशस्वी झाल्यावर 25 मार्चपासून देशभरात संपूर्ण लॉकडाऊन सुरू करण्यात आला. यानंतर हळूहळू कुलूप उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, कोरोना अजूनही आपल्यामध्ये आहे. पण आता लोक त्याच्यासोबत जगायला शिकले आहेत. जनता कर्फ्यूच्या दरम्यान, काही लोकांनी ज्या पद्धतीने टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या, की खूपच मजेदार होते. त्याच्याशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. या व्हिडिओंनी तेव्हा लोकांचे खूप मनोरंजन केले होते.

आणखी वाचा :

Viral photo : ‘या’ फोटोत तुम्हाला गाढव दिसतंय का? मग डोक्याला अजून ताण देण्याची गरज; JK Rowlingही confused

‘हे’ तर रिअल लाइफमधले tom & jerry! मांजरीला पाहून उंदीर काठीच्या टोकावर..! Funny video viral

Viral : भल्यामोठ्या अजगराच्या अंगावर बसून खेळतोय चिमुकला, Video काढणाऱ्यावर संतापले लोक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.