#JanataCurfew | जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती, सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ, फोटो व्हायरल

गेल्यावर्षी घोषित करण्यात आलेल्या या जनता कर्फ्यूचे काही फोटो चांगलेच ट्रेंड होत आहे. (Janata Curfew One Year Complete)

#JanataCurfew | जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती, सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ, फोटो व्हायरल
Janata Curfew

नवी दिल्ली : भारतीयांसाठी आजचा दिवस फार खास आहे. गेल्यावर्षी याच दिवशी जनता कर्फ्यूची लावण्यात आला होता. 22 मार्च 2020 हा दिवस जनता कर्फ्यू म्हणून ओळखला जातो. आज या जनता कर्फ्यूला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र अद्याप देशात कोरोनाचा धोका टळलेला नाही. गेल्यावर्षी घोषित करण्यात आलेला जनता कर्फ्यूच्या काही आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. (Janata Curfew One Year Complete social media Trend)

जनता कर्फ्यूला एक वर्ष पूर्ण

सध्या सोशल मीडियावर #JanataCurfew हा टॅग ट्रेंड होत आहे. या ट्रेंडच्या माध्यमातून अनेकांनी सोशल मीडियावर काही मजेशीर व्हिडीओ, फोटो, मीम्स ट्वीट केले आहेत. गेल्यावर्षी घोषित करण्यात आलेल्या या जनता कर्फ्यूचे काही फोटो चांगलेच ट्रेंड होत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आहे. यामुळे देशभरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत होता. सर्वजण आपपल्या घरात कैद झाले होते. यादरम्यान अनेकांनी मेणबत्ती लावत, थाळी वाजवत एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आज त्या जनता कर्फ्यूला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे #JanataCurfew हे ट्रेंड होत आहे.

(Janata Curfew One Year Complete social media Trend)

दरम्यान जनता कर्फ्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना संसर्गावर नियंत्रण लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. गेल्यावर्षी 24 मार्च रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. भारतातील प्रत्येक नागरिकाला आणि त्यांच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं. हा जनता कर्फ्यूच्या पुढील टप्पा असेल, असंही त्यांनी नमूद केलं होतं. यानुसार घराच्या बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली होती. (Janata Curfew One Year Complete social media Trend)

संबंधित बातम्या :  

दररोज 1 लाख लोकांना लस, 45 लाखाचं टार्गेट, मुंबई आयुक्तांचा मास्टर प्लॅन

भारतानं कोविडचे डोस रोखल्याचा इंग्लंडचा आरोप, सिरमनं आरोप फेटाळले, वाचा काय घडतं आहे?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI