जंगलाच्या राजाकडून गिधाडाची शिकार, Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय चपळाई आहे!’

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जंगलात तलावाच्या काठावर अनेक गिधाडे फिरत आहेत, मग अचानक सिंह तेथे येतो. सिंह पाहून सर्व पक्षी उडून जातात, पण एक गिधाड जंगलाच्या राजाच्या तावडीत सापडतो.

जंगलाच्या राजाकडून गिधाडाची शिकार, Video पाहून तुम्हीही म्हणाल, 'काय चपळाई आहे!'
सिंहाकडून गिधाडाची शिकार

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ आहेत. ज्यांना वन्यजीवांमध्ये रस आहे त्यांनी पाहिलं असेल की शिकारी प्राणी नेहमी त्यांच्या शिकारीच्या शोधात असतात आणि संधी मिळताच सावजावर हल्ला करतात… हे प्राणी सावज पकडण्यासाठी धूर्तपणे वेगाचा वापर करतात. विशेषतः सिंह, चित्त्यासारख्या मोठ्या प्राण्यांचा शिकारीचा अंदाज पाहण्याजोगा असतो. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात, ज्यात प्राणी एकमेकांची शिकार करताना दिसतात. या व्हायरल व्हिडिओमध्ये सिंहाने गिधाडावर हल्ला केल्याचं पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. काही सेकंदाच्या आत सिंह गिधाडावर झडप मारतो.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जंगलात तलावाच्या काठावर अनेक गिधाडे फिरत आहेत, मग अचानक सिंह तेथे येतो. सिंह पाहून सर्व पक्षी उडून जातात, पण एक गिधाड जंगलाच्या राजाच्या तावडीत सापडतो. असहाय्य गिधाड आपला जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण शेवटी सिंह त्याला पकडतो. गिधाड सिंहाची शिकार बनते. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील.

हा व्हिडिओ ट्विटरवर लाइफ अँड नेचर नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक ही व्हिडिओ क्लिप केवळ एकमेकांसोबत शेअर करत नाहीत तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आणि प्रतिक्रिया देखील देत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच रोमांचित झाला असाल. पहिल्यांदा सिंह गिधाडाची शिकार करताना पाहिले आहे, अशा प्रतिक्रिया नेटकरी नोंदवत आहेत.

(lion making vulture its Prey Viral Video trending On Social Media)

हे ही वाचा :

Video | नवरदेव पाहताच नवरी भारावली, केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

Video | पाणीपुरीवाल्याचा प्रताप, लघवी करुन पाण्यात मिसळली, व्हिडीओ पाहून देशभरात संताप

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI