रामदेव बाबांच्या शिबिरात पहिली भेट, अमरावतीत मैत्री, मुंबईत प्रेम, नवनीत कौर अशा झाल्या मिसेस राणा!

खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली. त्यामुळे राणा दाम्पत्य चांगलंच चर्चेत आहे. या दोघेही सार्वजनिक जीवनात वावरत असल्याने त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेकांना उत्सुकता आहे. नवनीत राणा कोण आहेत? या दोघांची पहिली भेट कुठे झाली तसंच यांची लव्हस्टोरी कशी फुलत गेली? आणि त्यांचा राजकारणातील वावर याविषयी जाणून घेऊयात...

रामदेव बाबांच्या शिबिरात पहिली भेट, अमरावतीत मैत्री, मुंबईत प्रेम, नवनीत कौर अशा झाल्या मिसेस राणा!
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 2:18 PM

मुंबई : सध्या महाराष्ट्राचं राजकारण हनुमान चालिसा, मस्जिदीवरचे भोंगे यांच्याभोवती फिरतंय. अश्यातच राणा दाम्पत्य मात्र चांगलंच चर्चेत आलं आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली. त्यामुळे राणा दाम्पत्य चांगलंच चर्चेत आहे. या दोघेही सार्वजनिक जीवनात वावरत असल्याने त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेकांना उत्सुकता आहे. नवनीत राणा कोण आहेत? या दोघांची पहिली भेट कुठे झाली तसंच यांची लव्हस्टोरी (Navneet Rana and Ravi Rana Lovestory) कशी फुलत गेली? आणि त्यांचा राजकारणातील वावर याविषयी जाणून घेऊयात…

नवनीत राणा कोण आहेत?

नवनीत राणा यांचं लग्नाआधीचं नाव नवनीत कौर. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1986 ला मुंबईत झाला. कौर कुटुंब मूळचं पंजाबचं. त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होते. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर नवनीत यांनी मॉडेलिंग करायला सुरूवात केली. त्यांनी काही म्युझिक अल्बममध्ये काम केलं. पुढे त्यांना एका तेलगू चित्रपटांसाठी विचारणा करण्यात आली. अन् त्यांचा अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू झाला. कन्नड, तेलगू, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यांनी चेतना, अंबासमुद्रम अंबानी, लव्ह इन सिंगापूर, गुड बॉय, लव्हशुदा, लिटल टेरर्स या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

नवनीत कौर यांचे योगगुरू बाबा रामदेव यांच्याशी निकटचे संबंध आहेत. नवनीत राणा त्यांच्या आश्रमात वरचेवर जात असत. तिथे एकदा योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा तिथे रवी राणा आले होते. तिथेच या दोघांची पहिली भेट झाली. पुढे ओळख वाढत गेली. मैत्रीचं नातं निर्माण झालं. अन् पुढे मुंबईत कामानिमित्त त्यांच्या भेटी वाढल्या याचकाळात ते दोघे हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

लग्नाची गोष्ट

दोघांनी आपआपल्या घरी या नात्याबद्दल सांगितलं. घरच्यांची मान्यता मिळताच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2011 मध्ये या दोघांनी एका सामुहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. याच सामुहिक विवाहसोहळ्यात दोघे लग्नबंधनात अडकले. 2 फेब्रुवारी 2011 त्यांची साताजन्मासाठी फेरे घेतले. या विवाह सोहळ्यात 3162 जोडप्यांनी लग्नगाठ बांधली. या लग्नाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाबा रामदेव, सुब्रत रॉय आणि विवेक ओबेरॉय यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.

सध्या नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघाचं लोकसभेत नेतृत्व करतात. त्या मतदारसंघातील विविध समस्या लोकसभेत मांडत असतात. तर महिला आणि तरूणींशी संबंधित प्रश्नांवर त्या हिरिरीने बोलताना दिसतात.

रवी राणा हे अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. विधीमंडळ अधिवेशनात ते विविध मुद्दे उपस्थित करताना दिसतात. आता हे राणा दाम्पत्य हनुमान चालिसापठणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलं आहे.

संबंधित बातम्या

खाकीला कडक सॅल्यूट!, वृद्ध महिलेला पाठीवर घेऊन वाळवंटात 5 किमी प्रवास, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Video : लग्नाच्या सेलिब्रेशनला लाखोंचा खर्च, नातेवाईकाच्या अतिउत्साहामुळे हजारो रूपयांचा केक मातीमोल

फोटोत दिसणाऱ्या कॉफीच्या मागे दडलंय एक रहस्य, जाणून घ्या नेमकं काय आहे?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.