Video | बोटाच्या मदतीने एका क्षणात कापलं टरबूज, माणसाची करामत पाहून नेटकरी अवाक्

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, यामध्ये एका माणसाने टरबूज कापण्यासाठी मजेदार ट्रिकचा वापर केला आहे.

Video | बोटाच्या मदतीने एका क्षणात कापलं टरबूज, माणसाची करामत पाहून नेटकरी अवाक्
WATERMELON VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने चुटकीसरशी टरबूज कापून दाखवले आहे. या मजेदार ट्रिकचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

टरबूज कापण्यासाठी मजेदार ट्रिकचा वापर

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, यामध्ये एका माणसाने टरबूज कापण्यासाठी मजेदार ट्रिकचा वापर केला आहे. त्याने केलेली ही करामत पाहून नेटकरी अवाक् झाले असून त्याने हे नेमकं कसं केलं ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पाहा व्हिडीओ :

टरबूज कापण्यासाठी माणसाने नेमकं काय केलं आहे ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय चकित करणारा आहे. माणसाने एका चुटकीसरशी आपल्या हाताच्या बोटांच्या माध्यमातून टरबुजाचे तुकडे केले आहेत. त्यासाठी त्याने एक टूथपिक घेतले आहे. त्याने टूथपिक टरबुजामध्ये खुपसलेय. तसेच नंतर हाताच्या बोटांनी त्याने टरबुजावर मारले आहे. टरबुजावर मारताक्षणी त्याचे तुकडे होऊन गेले आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. माणसाने एका क्षणात टरबुजाचा तुकडे कसे काय केले ? असा प्रश्न लोकांना पडला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी तर हे अशक्य असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला yournaturegram या ट्विटर अकाऊंवटर शेअर करण्यात आले.

इतर बातम्या :

Video: दिल्ली-गुरुग्राम रस्त्याच्या ब्रीजखाली एअऱ इंडियाचं विमान अडकलं, नेमकं सत्य काय?

Video: राकेश बापट आणि शमिता शेट्टीचे रोमॅन्टिक रिल्स, व्हिडीओंवर लोकांकडून प्रेमाचा वर्षाव

Video: 24 वर्षांपूर्वी शाहरुख म्हणाला होता, मला वाटतं माझ्या मुलाने ड्रग्जही घेतले पाहिजे, व्हिडीओ व्हायरल!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI