AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीही निघाली सव्वाशेर ! नवऱ्याने 29 बायका केल्या, तर तिने 23 नवरे, शेवटचं लग्न करताच नवऱ्याचा…

ग्लिन यांनी तरुणींसह प्रौढ महिलांशीही विवाह केले आहेत. त्याने गावखेड्यातील महिलांशीही विवाह केला आहे. तर ड्रग्स घेणाऱ्या महिलांसोबतही संसार थाटला होता.

तीही निघाली सव्वाशेर ! नवऱ्याने 29 बायका केल्या, तर तिने 23 नवरे, शेवटचं लग्न करताच नवऱ्याचा...
Glynn WolfeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 15, 2023 | 8:58 AM
Share

वॉशिंग्टन: लग्न हे पवित्र बंधन मानलं जातं. भारतासारख्या महाकाय देशात तर लग्नाला पवित्र बंधन बांधलं जातं. आणि आयुष्यभर पती-पत्नी हे बंधन निभावतात. पण पाश्चात्य देशात लग्न बंधनाला फारसं सीरियसली घेतलं जात नाही. म्हणूनच पाश्चात्य देशात वारंवार घटस्फोट घेण्याचे प्रकार वाढले आहेत. अमेरिकेत तर एक भन्नाट किस्सा समोर आला आहे. एका व्यक्तीने आतापर्यंत 29 वेळा लग्न केलं. गंमत तर पुढे आहे. नवऱ्याने 29 वेळा लग्न केल्याने पत्नीनेही 23 वेळा लग्न केलं. विशेष म्हणजे या दोघांच्या सर्वाधिक वेळा विवाह करण्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे या लग्नाच्या गोष्टी सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

अमेरिका प्रांताच्या कॅलिफोर्नियाच्या रेडलँडसमध्ये राहणाऱ्या ग्लिन वुल्फे याने सहा सातवेळा नव्हे तर चक्क 29 वेळा लग्न केलं. त्याचं पहिलं लग्न 1927मध्ये झालं होतं. तर शेवटचा विवाह 1996मध्ये झाला होता. मात्र या लग्नानंतर त्याचा मृत्यू झाला.

मरेपर्यंत लग्न

ज्या पद्धतीने लोक कपडे बदलतात, तसेच ग्लिन वुल्फेने बायका बदलल्या. काही वर्ष एका पत्नीसोबत राहिल्यानंतर लगेच तिच्यापासून ते घटस्फोट घ्यायचे. नंतर दुसरं लग्न करायचे. मृत्यूपर्यंत ते लग्न करत राहिले. त्यांना एकूण 41 मुले होती, असं सांगितलं जातं.

फक्त 19 दिवसांचा संसार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्लिन यांनी ज्या महिलेसोबत विवाहानंतर सर्वाधिक काळ घालवला तिचं नाव क्रिस्टीन कमैको असं होतं. ती त्यांची 28 वी पत्नी होती. क्रिस्टीन सोबत त्यांनी 11 वर्ष संसार केला. तर सर्वात कमी दिवस संसार करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर नोंद आहे. एका महिलेसोबत त्यांनी केवळ 19 दिवस संसार केला होता.

शेवटची सव्वाशेर निघाली

ग्लिन सर्वाधिक विवाह करणारा पुरुष असल्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांची शेवटची पत्नी लिंडा काही कमी नव्हती. तीही शेरास सव्वाशेर होती. तिनेही 23 वेळा लग्न केल्याचं सांगितलं जातं. सर्वाधिक विवाह करणारी महिला म्हणून लिंडाचं नावही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.

अन् सिलसिला सुरू झाला

तब्बल 70 वर्ष ग्लिन यांनी विवाह केले. ते कॅलिफोर्नियाच्या रेडलँड्स येथील रहिवासी होते. त्यांचा जन्म 1908मध्ये झाला. वयाच्या 88व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा विवाह करण्याचा हा सिलसिला 1926 पासून सुरू झाला.

अविवाहित तरुणी ते वेश्यांशी विवाह

ग्लिन यांनी तरुणींसह प्रौढ महिलांशीही विवाह केले आहेत. त्याने गावखेड्यातील महिलांशीही विवाह केला आहे. तर ड्रग्स घेणाऱ्या महिलांसोबतही संसार थाटला होता. त्यांनी अविवाहित तरुणींसोबतही विवाह केला आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसोबतही विवाह केला आहे. यातील काही विवाह बराच काळपर्यंत टिकून होते. तर काहींशी त्यांनी कमी काळात काडीमोड घेतली.

एकाच महिलेशी दोनदा विवाह

ग्लिन यांनी 29 वेळा विवाह केले. त्यांनी अनेकदा तर एकाच महिलेशी दोनदा विवाह केली आहे. रिपोर्टनुसार त्यांनी 29 महिलांसोबत 31 वेळा विवाह केला आहे. तीन महिलांना घटस्फोट देऊन त्यांनी दुसऱ्यांदा विवाह केला होता.

तर पाचवेळा त्यांना पत्नीचा मृत्यू झाल्याने दुसरा विवाह करावा लागला. त्यांना 41 मुले होती. पण एक मुलगा वगळता त्यांची इतर मुले त्यांच्या अंत्यसंस्काराला आले नाहीत.

इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....