Nagpur: खतरनाक! पठ्ठ्याने सापाला CPR देऊन वाचवला जीव, नागपूरमधील चकीत करणारी घटना
Nagpur: नागपूरमध्ये एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका सर्पमित्राने मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या सापाला जीवदान दिले. सर्पमित्र हर्षलने सापाला पहिले पाणी पाजले. त्यानंतर तोंडाने सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवला. ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

अनेकदा आपत्कालीन परिस्थितीमध्ये माणसांना सीपीआर देण्यात येतो आणि हे प्रकार सामान्य आहेत. पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला सीपीआर देण्याची घटना ऐकली आहे का? एखाद्या माणसाने सापाला सीपीआर देऊन त्याची जीव वाचवला, हे ऐकलं आहे का? ही कल्पना करताच तुमच्या अंगावर काटा येईल, पण ही वास्तविकता आहे. प्रकरण महाराष्ट्रातील नागपूरमधील आहे. येथील हिंगणामध्ये ही अभूतपूर्व घटना घडली आहे. एका सर्पमित्राने एका सापाला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) दिला आणि त्याला यशस्वीपणे शुद्धीत आणले.
हिंगणामध्ये राहणाऱ्या सर्पमित्र हर्षल शेंडे यांना एका घरात साप असल्याची माहिती मिळाली. ते तिथे पोहोचले. त्यांनी पाहिले की, येथील सामान्य साप एका ड्रमच्या खाली अडकलेला आहे. त्यांनी सांगितले की, साप कुठलीही हालचाल करताना दिसत नव्हता, तेव्हा त्यांना जाणवले की काही तरी गडबड आहे.
वाचा: मी तुमच्यासोबत झोपू का…; अभिषेक बच्चनने टॉप अभिनेत्रीकडे केली होती मागणी!
सापाला पाणी पाजले
हर्षल यांनी सांगितले की, साप खूप वाईट स्थितीत होता. त्याला ताबडतोब सीपीआरची गरज होती. मी त्याला पाणी पाजले. थोडे पाणी प्यायल्यावर साप शुद्धीत आला. त्यानंतर धैर्य दाखवत हर्षलने सापावर सीपीआर द्यायला सुरुनात केली. तिथे उभे असलेले सर्व लोक हे पाहून थक्क झाले.
सापाला जंगलात सोडले
काही सीपीआर प्रयत्नांनंतर, साप हालचाल करु लागला. पाणी पाजल्यानंतर, साप काही मिनिटांतच शुद्धीवर आला. साप पूर्णपणे शुद्धीत आल्याची खात्री करून हर्षलने त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडले. हर्षल शेंडे यांनी सांगितले की, तो साप विषारी नव्हता. साप ज्या प्रकारे बेशुद्ध अवस्थेत होता, त्याला ताबडतोब शुद्धीत आणून सीपीआर दिला नसता तर तो मेला असता. त्या वेळी त्याचा जीव वाचवण्यासाठी हाच एक मार्ग होता, म्हणून त्यांनी त्याला पाणी पाजून शुद्धीत आणले आणि त्यानंतर सीपीआर देऊन त्याच्या हृदयाला पंप केले.
(टिप: असा प्रकार कुणीही करू नये. हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो. आम्ही अशा कोणत्याही प्रकाराचं समर्थन करत नाही. केवळ कुणीही असा प्रकार करू नये म्हणून ही माहिती देत आहोत.)
