Video : मुलींची छेड काढून, खाकी वर्दीशी हुज्जत, मग काय पोलिसांनी गटराजवळ लोळवलं, अधीच विसरणार नाही अशी दिली शिक्षा!
Video : मुलींची छेड काढणाऱ्या नराधमाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय... खाकी वर्दीशी हुज्जत घालणाऱ्याला पोलिसांनी गटराजवळ लोळवलं... अधीच विसरणार नाही अशी दिली शिक्षा! व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

देशात खरंत मुली, महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहेत. गेल्या काही दिवसांपसून महिलांवर होणाऱ्या अत्याराचांच्या घटनेत देखील मोठी वाढ होत आहे. फक्त घराच्या बाहेरच नाही तर, घरात देखील आता महिला सुरक्षित नाहीत आणि हे वास्तव आहे. बसमध्ये, ट्रेनमध्ये, रस्त्यावरुन चालताना देखील महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश उपस्थित आहे. पण आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये निर्भया पथकाने मोठी कारवाई करत एका नराधमाला ताब्यात घेतलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ भांडुप येथील आहे. भांडुप निर्भया पथकाने छेडछाड करणाऱ्यावर त्वरित कारवाई केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील भांडुप परिसरातून एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्याने जाणाऱ्या महिलांची छेड काढताना आणि त्यांना त्रास देताना दिसत आहे. या एका व्यक्तीमुळे महिलाचं रस्त्यावरुन चालणं देखील कठीण झालं आहे,
मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप- 6 चे निर्भया पथक गस्तीवर असताना, त्यांच्या निदर्शनास आलं की, छेड काढत असलेल्या व्यक्तीने पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सतर्क निर्भया पथकाने पाठलाग करून त्याला तत्काळ ताब्यात घेतलं आणि त्याला चांगलाच चोप दिला… सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे, व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
𝕄𝕌𝕄𝔹𝔸𝕀 | Bhandup Nirbhaya Squad Takes Swift Action Against Harassment | A viral video from Mumbai’s Bhandup area shows a man allegedly harassing women passing by on the road.
According to the video, the Bhandup-6 Nirbhaya Squad of @MumbaiPolice, while on patrol, noticed… pic.twitter.com/KYCUsKkD9S
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) September 5, 2026
व्हिडीओत कैद झालेली घटना सांगतेय की, सतर्क पोलिसांचं महत्त्व आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटणं किती गरजेचं आहे. देशात महिलांना सुरक्षित फिरता यावं असं वातावरण तयार झालंच पाहिजे… त्यामुळे निर्भया पथक सकर्त राहत योग्य ती कारवाई करताना दिसत आहेत.
सांगायचं झालं तर, राज माजी नावाच्या एक्स अकाउंटवरुन पोस्ट शेअर करण्यात आली आहे. व्हिडीओ पोस्ट करत असं देखील सांगण्यात आलं आहे की, तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला कोणतीही महिला छेडछाड किंवा त्रासाला सामोरी जात असेल, तर क्षणाचा विलंब न करता पोलिसांची तात्काळ मदत घ्या.
महिलांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा कोणत्याही महिलेला वाटलं की, त्या सुरक्षित नाही, तेव्हा त्यांनी मुंबई पोलिसांच्या महिला हेल्पलाइन क्रमांक 103 वर संपर्क साधू शकतात. सतर्क राहा. आवाज उठवा. छेडछाडीची तक्रार करा. महिलांची सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी आहे…. असं देखील पोस्टमध्ये लिहिलं आहे.
