कर्नाटकमध्ये नवा प्रयोग, मास्क फेकल्यानंतर थेट झाड उगवणार; जाणून घ्या नेमकं कसं ?

कर्नाटकमध्ये नवा प्रयोग, मास्क फेकल्यानंतर थेट झाड उगवणार; जाणून घ्या नेमकं कसं ?
paper seed mask

ध्या एका अनोख्या मास्कची देसभरात चर्चा सुरु आहे. हे मास्क फेकून देताच त्यातून चक्क झाड उगवणार आहे. (nitin vas mangalore made mask corona)

prajwal dhage

|

Apr 22, 2021 | 11:51 PM

बंगळुरू : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज नवे कोरोनाग्रस्त आढळत असल्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाला (Corona) थोपवायचे असेल तर मास्क वापरणे गरजेचे असल्याचे आरोग्यविषयक तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. देशभरात करोडो मास्कची निर्मिती केली जात आहे. तसेच तेवढ्याच प्रमाणात मास्क फेकूनसुद्धा दिले जातायत. फेकून दिलेल्या मास्कमुळे प्रदूषण वाढण्याचीसुद्धा शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्या एका अनोख्या मास्कची देसभरात चर्चा सुरु आहे. हे मास्क फेकून देताच त्यातून चक्क झाड उगवणार आहे. (Nitin Vas from Mangalore made mask to stop Corona from which tree can be grown outer layer is embedded with plants seeds and vegetables)

कर्नाटकच्या नितीन वास यांची कमाल

देशभरात मोठ्या संख्येने मास्कचे उत्पादन घेतले जात आहे. दुसरीकडे तेवढ्याच प्रमाणात मास्क फेकूनसुद्धा दिले जात आहेत. त्यामुळे मास्क कुठेही फेकून दिल्यामुळे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे कर्नाटकमधील पेपर सीड कंपनीचे मालक नितीन वास (Nitin Vas) यांनी एक अनोखा मास्क तयार केला आहे. हे मास्क फेकून दिल्यानंतर त्यातून चक्क झाड उगवणार आहे. तशी माहिती नितीन यांनी दिली आहे. त्यांनी तयार केलेले मास्क हे पूर्णपणे इकोफ्रेंडली असल्याचं ते सांगतात.

मास्क कसे तयार होते ?

नितीन वास यांनी सांगितल्याप्रमाणे हे एक कॉटनचे मास्क आहे. या मास्कच्या बाहेरचा हिस्सा हा कॉटन पल्‍पपासून तयार केला जातो. तसेच हे मास्क तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रॅप मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. मास्कच्या आतल्या बाजूला सॉफ्ट अशा कॉटनच्या कपड्याचा वापर करण्यात आलाय. याबाबत बोलताना मास्कच्या आतील कॉटन हा खूप थिक असल्याचे नितीन यांनी सांगितलं आहे. तसेच, हा मास्क आपल्याला कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण देतो असंही त्यांनी सांगितलं आहे.

मास्कमधून झाड कसे उगवणार ?

एका मास्कला फेकून दिल्यानंतर त्यातून एक झाड कसे तयार होऊ शकते, हा पश्न अनेकांना पडला आहे. मात्र, हे शक्य असल्याचा दावा नितीन वास करतात. त्यांनी तसे मास्क तयार केले आहे. हे मास्क फक्त एकदाच वापरता येईल. या मास्कची किंमत 25 रुपये असून अगदीच परवडणारे आहे. त्यांनी तयार केलेले मास्क चेहऱ्यावरुन काढल्यानंतर त्याला कुठेही फेकून न देता फक्त मातीमध्ये पुरावे लागेल. त्यानंतर मास्क पुरलेल्या ठिकाणी काही दिवस पाणी टाकल्यानंतर तिथून झाड उगवेल, असे नितीन यांनी सांगितलं आहे. अशा प्रकारचे मास्क तयार करण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतल्याचे नितीन सांगतात.

मास्कमध्ये झाडांच्या बिया

दरम्यान हे मास्क तयार करण्यासाठी आठ तासांचा वेळ लागतो. तसेच हे मास्क तयार केल्यानंतर ते कोरडे होण्यासाठी 12 तास लागतात. या मास्कमध्ये झाडांच्या बिया असल्यामुले त्यांना स्टोअर केले जाऊ शकत नाही. त्यामुळे सध्यातरी नितीन वास हे फक्त 3,000 मास्कचे उत्पादन घेत आहेत. या मास्कची देशभरात चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : भिवंडीमध्ये दिवसभरात 291 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

आम्ही ह्या पापी समाजाचे घटक आहोत, रुग्णांसाठी काहीच करु शकत नसल्याची लाज वाटते, खंडपीठाची टिप्पणी

Maharashtra Oxygen Express : प्राणवायू घेऊन ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ महाराष्ट्राकडे रवाना, राज्याला नवसंजिवनी!

(Nitin Vas from Mangalore made mask to stop Corona from which tree can be grown outer layer is embedded with plants seeds and vegetables)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें