Optical Illusion | या चित्रात Y अल्फाबेट शोधून दाखवा!
ब्रिटनमधील टॅब्लॉइड 'द सन'ने नुकताच हा ब्रेन टीझर शेअर केला आहे. लोक दिलेल्या वेळेत Y अल्फाबेट कुठे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आपल्याला सोपे वाटेल. पण या खेळात पारंगत असलेल्या खेळाडूंसाठीही दिलेल्या वेळेत उत्तर शोधणे जमलेले नाही. तुम्हाला ट्राय करायला आवडेल का?

मुंबई: सध्या सोशल मीडियावर एका ब्रेन टीझरने नेटकऱ्यांना गोंधळून टाकलं आहे. खरं तर हे काम अगदी सोपं आहे, पण ते पूर्ण करण्यासाठी लोकांना घाम फुटलाय. या व्हायरल झालेल्या ब्रेन टीझरमध्ये Y अल्फाबेट शोधायचा आहे. या चित्रात तुम्हाला V हे अल्फाबेट दिसेल पण तुम्हाला यात Y शोधायचा आहे. विशेष म्हणजे तुम्हाला या कोड्याचं उत्तर 10 सेकंदात शोधायचे आहे. पण हे चित्र साधंसुधं नाही, गोंधळून टाकणारं आहे. असणारच! ऑप्टिकल भ्रम असेच असतात, गोंधळून टाकणारे.
आपण 10 सेकंदापेक्षा कमी वेळात Y अल्फाबेट पाहू शकता? अनेकांनी प्रयत्न केले आणि यशस्वीही झाले. पण हे उत्तर तुम्हाला ठरलेल्या मुदतीत पूर्ण करायचे आहे. आता आपले लक्ष खालील टीझरकडे वळवा आणि नीट लक्ष देऊन बघा. बहुतेक लोकांना या कोड्याचं उत्तर शोधणे खूप कठीण जात आहे.

spot the alphabet Y
आता अल्फाबेट्सची मालिका नीट बघा, या चित्राकडे बारीक लक्ष द्या. कुठे Y दिसतोय का? आपण लहानपणी कोडी सोडवायचो. ही देखील एकप्रकारची कोडीच आहेत. फक्त दिलेल्या वेळेत उत्तर शोधणं हे मात्र मोठं आव्हान आहे. तुम्ही अजूनही संघर्ष करत असाल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. बातमीच्या शेवटी आम्ही एक चित्रही शेअर केले आहे. तुम्हाला उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! नसेल सापडलं तर आम्ही खाली खास तुमच्यासाठी उत्तर देत आहोत.

here is the alphabet Y
