Video : रमजाननिमित्त पाकिस्तानी यूट्यूबरचं नवं गाणं, ऐकून म्हणाल, सेम टू सेम कच्चा बदाम!

पाकिस्तानच्या यासिर सोहरवर्दी या यूट्यूबरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्याने आणलेलं नवं गाणं सध्या ट्रेंडिंग आहे. कच्चा बदामच्या चालीवर आया रमजान, रमजान असे या गाण्याचे बोल आहे.

Video : रमजाननिमित्त पाकिस्तानी यूट्यूबरचं नवं गाणं, ऐकून म्हणाल, सेम टू सेम कच्चा बदाम!
भुबन बड्याकर , यासिर सोहरवर्दी
आयेशा सय्यद

|

Apr 12, 2022 | 4:10 PM

मुंबई : कच्चा बदाम (Kacha Badam) या गाण्याची अनेकांच्या मनात विशेष जागा आहे. अनेकांना हे गाणं प्रचंड आवडतं अनेकजण यावर रील्सही बनवत असतात. सोशल मीडियावर (Social Media) या बंगाली गाण्याची मोठ्या प्रमाणावर क्रेझ पाहायला मिळतेय. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आता परदेशातही लोक रील्स बनवून हे गाणे शेअर करत आहेत. हे गाणं भुबन बड्याकर तर रातोरात स्टार झाला. सध्या कच्चा बदाम या गाण्याचं नवं व्हर्जन ऐकायला मिळतंय. सध्या मुस्लिम धर्मीयांचा परित्र रमजान (Ramzan) महिना सुरू आहे. पाकिस्तानच्या एका यूट्यूबरने रमजाननिमित्त या गाण्याचं नवं व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आणलंय. यासिर सोहरवर्दी (Yasir Soharwardi) असं या यूट्यूबरचं नाव आहे. ‘रमजान, रमजान आया रमजान रमजान…’ असे या गाण्याचे बोल आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yasir Soharwardi (@yasir_soharwardi)

रमजान गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

पाकिस्तानच्या यासिर सोहरवर्दी या यूट्यूबरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्याने आणलेलं नवं गाणं सध्या ट्रेंडिंग आहे. कच्चा बदामच्या चालीवर आया रमजान, रमजान असे या गाण्याचे बोल आहे. या गाण्याला दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर दो हजारहून अधिक लोकांनी लाईक केलंय. त्याच्या या गाण्याची पाकिस्तानसह भारतातही जोरदार चर्चा आहे.

यासिर सोहरवर्दी हा पाकिस्तानमधील प्रसिद्ध यूट्यूबर आहे. त्याने नुकतंच रमजान हे गाणं लाँच केलं आहे. हे गाणं ऐकल्यानंतर आपल्याला आपसूकच कच्चा बदाम या गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

सध्या बाकी नींबू बाद विच पाऊंगा! या गाण्याचीही जबरदस्त क्रेझ आहे. गौरव सागर या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला 15 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर साडे नऊ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. हा व्हीडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळतोय. त्याची सोडा ग्लासमध्ये ओतण्याची आणि लिंबूपाणी बनवण्याची पद्धत अनेकांना भावतेय. तीन वर्षांपूर्वीही या व्यक्तीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याचा हा बाकी नींबू बाद विच पाऊंगा! व्हीडिओही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतोय. हा व्हीडिओ पंजाबमधील रूपनगरमधील असल्याचं बोललं जातंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gourav Sagar (@13_gouravsagar05)

संबंधित बातम्या

Viral Video : स्वच्छ आकाश… निळशार पाणी, लडाखच्या पॅंगाँग तलावात तीन तरूणांचे ‘तीर’, नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

खाकी स्टुडिओमध्ये रंगले इजिप्तचे सुर! ‘या मुस्तफा’ गाण्याचं मुंबई पोलीस बँडच्या वतीने सादरीकरण

Video : आता तर हद्दच झाली! नूडल्सची हेअरस्टाईल, हटके केस खाण्यासाठी दोन मुलींची घाई, व्हीडिओ एकदा बघाच…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें