Parle G : स्वस्तातील पारले-जी पॅकेट 2400 रुपयांना; गाझातील Viral Video ने जगाला धक्का
Parle G Biscuit Gaza Viral Post : भारतात अवघ्या 5 रुपयांना पारले जी बिस्किट पुडा मिळतो, तर गाझा पट्ट्यात युद्धामुळे परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, याठिकाणी या आवडत्या बिस्किटाच्या पॅकेटसाठी 2000 रुपयांपेक्षा अधिकच पैसा मोजावा लागत आहे.

पारले जी हा अनेकांचा अजूनही वीक पॉईंट आहे. अबालवृद्धांपासून हे बिस्किट सर्वांचेच आवडते आहे. सध्या गाझामधील एका व्यक्तीची पोस्ट जगभरात व्हायरल झाली आहे. भारतात स्वस्त मिळणाऱ्या बिस्किटासाठी गाझात 2400 रुपये मोजावे लागत असल्याचे या व्हायरल पोस्टमध्ये समोर आले आहे. हमास आणि इस्त्रायल यांच्या युद्धात गाझा पट्टी होरपळून निघाली आहे. गेल्या दोन वर्षांत इथले अनेक नागरीक ठार झाले आहेत. दहशतवाद्यांमुळे येथील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर काही मुस्लिम देश हा इस्त्रायलाचा अतितायीपणा असल्याचा आरोप करत आहेत.
गाझातील जनता निघाली भरडून
इस्त्रायल आणि हमास यांच्या युद्धात गाझातील जनता भरडून निघाली आहे. अनेकांचा जीव गेला आहे. त्यात महिला आणि बालकांचा सर्वाधिक समावेश आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या उपासमारीच्या संकटात भारतात स्वस्तात मिळणाऱ्या पारले-जी सारख्या बिस्किटांसाठी 2400 रूपये मोजावे लागतील. एक बिस्किट हे या भूकबळींचे आणि उपासमारीचे जणू दर्शक झाले आहे.




काय आहे पोस्ट?
एका व्हायरल पोस्टमध्ये एका व्यक्तीने मोठा दावा केला आहे. या व्हायरल पोस्टमध्ये त्याने दावा केला आहे की, पारले जी बिस्किट पॅकेट 24 युरो म्हणजे जवळपास 2,342 रुपयांना खरेदी केले आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर आज रफीक याला त्याचे आवडते बिस्किट देऊ शकलो. किंमत सध्या 1.5 युरो ते 24 युरो दरम्यान आहे. पण त्याला नाही पण नकार सुद्धा देऊ शकलो नाही, अशी भावनिक पोस्ट त्याने लिहिली आहे. त्याच्या या दाव्याने जगाला धक्का बसला आहे.
एका दाव्यानुसार, ऑक्टोबर 2023 मध्ये इस्त्रायल-गाझा संघर्ष वाढला. त्यानंतर खाद्य आणि अन्न पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. मार्च ते मे 2025 या काळात गाझा तर पूर्णपणे बंद झाले आहे. संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारी मदत सुद्धा इस्त्रायलने थांबवल्याचा दावा करण्यात येत आहे. Secure Distribution Site 1 (SDS1) मॉडल या पट्ट्यात लागू करण्यात आले आहे. त्यानुसार, अमेरिका, स्वित्झर्लंड आणि इस्त्रायल हे या पट्ट्यात मदत सामुग्री पोहचवत आहेत. फ्रान्सचे वृत्तपत्र Le Monde च्या दाव्यानुसार, खासगी सुरक्षा व्यवस्थेच्या निगराणीत या भागात अन्नधान्य, खाद्यान्न पोहचवण्यात येत आहे. केवळ पारले जी पुडाच नाही तर सर्वच पदार्थ महागल्याचा दावा या भागातील शल्यचिकित्सक डॉ. खालिद अलशावा यांनी केला आहे. पारले जीचे एक पॅकेट साधारणतः 240 रुपयांना मिळते. पण या भागात ते 2000 रुपयांपेक्षा अधिक रुपयांना मिळत आहे.