Video | मित्रांनी दिलं अजब गिफ्ट, नवरी-नवरदेव थेट हसायला लागले, पाहा व्हिडीओ

सध्या मात्र एक अतिशय आगळावेगळा आणि मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या नवरदेवासोबत त्याच्या मित्रांनी चांगलीच मस्करी केली आहे. हा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरतोय.

Video | मित्रांनी दिलं अजब गिफ्ट, नवरी-नवरदेव थेट हसायला लागले, पाहा व्हिडीओ
marriage viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कोणता व्हिडीओ चर्चेचा विषय ठरेल हे सांगता येत नाही. प्राणी पक्ष्यांचे व्हिडीओ तर नेटकरी आवडीने बघतात. प्रँक, विनोदी तसेच डान्सचे व्हिडीओ नेटकऱ्यांना पाहायला आवडते. सध्या मात्र एक अतिशय आगळावेगळा आणि मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या नवरदेवासोबत त्याच्या मित्रांनी चांगलीच मस्करी केली आहे. हा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरतोय.

मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून नवरी-नवरदेव खुश

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे हे मात्र नक्की. या व्हिडीओमध्ये लग्नमंडपात नवरी आणि नवरदेव उभे आहेत. तर नवरदेवाचे मित्र या दोघांकडे एक मोठा बॉक्स घेऊन आले आहेत. या बॉक्समध्ये अतिशय आगळंवेगळं गिफ्ट असावं असं सुरुवातीला सगळ्यांनाच वाटतं. मात्र खरं पाहता या मोठ्या बॉक्समध्ये काहीतरी वेगळेच ठेवण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये दिसते आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धम्माल उडवून दिली आहे.

मित्रांनी मोठ्या बॉक्समध्ये नेमकं काय दिलं ?

व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव नटून-थटून उभे आहेत. तर समोरून चार ते पाच मित्र या जोडीकडे येताना दिसत आहेत. त्यांच्या हातामध्ये एक मोठा बॉक्स आहे. या बॉक्सला फुलांनी सजविण्यात आले असून तीन ते चार जण त्याला घेऊन येत असल्यामुळे त्यामध्ये काहीतरी मौल्यवान आणि मोठी वस्तू असावी असं वाटतंय. मित्रांनी नवरी नवरदेव यांच्याकडे जाऊन हे गिफ्ट त्यांना दिलं आहे. तसेच अतिशय चांगलं फोटोशूटसुद्धा केलं आहे. त्यानंतर मित्र तेथून निघून गेले आहेत. काही वेळानंतर नवरी आणि नवरदेवाने दिलेले गिफ्ट या दोघांनी खोलले आहे. मात्र एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये मित्रांनी काहीही दिलेले नाही. मस्करीचा भाग म्हणून मित्रांनी नवरी आणि नवरदेव यांना हे गिफ्ट दिलेलं आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय. नेटकरी त्याला अतिशय उत्स्फूर्तपणे शेअर करत असून वेगवेगळ्या कमेंटदेखील करत आहेत. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडओ अतिशय मजेदार असल्याचे सांगितले आहे. तर काही नेटकऱ्यांनी हे गिफ्ट अतिशय मस्त असल्याचे म्हटले आहे. सध्या व्हिडिओला इंस्टाग्रामवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video: बॉलसारखा गोल, 4 पाय आणि विचित्र चेहरा, या समुद्री प्राण्याला तुम्ही ओळखता का?

Video: शेकडो किलोचं पोतं एका झटक्यात फेकलं, लोक म्हणाले, बोला बजरंगाची कमाल, हमाल, दे धमाल!

Video: जेवण घशात अडकलं, श्वास गुदमरला, आणि त्याचा जीव जाणार तितक्यात…पाहा व्हिडीओ!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI