AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाषण ऐकताच हातातून निसटली दुधाची बादली, बसला मानसिक धक्का, झाले नुकसान, राहुल गांधींविरोधात व्यक्ती कोर्टात

Rahul Gandhi Speech : बिहार येथील एका व्यक्तीने एक अजब दावा केला आहे. त्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात कोर्टात दावा दाखल केला आहे. त्याने या भाषणामुळे 250 रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

भाषण ऐकताच हातातून निसटली दुधाची बादली, बसला मानसिक धक्का, झाले नुकसान, राहुल गांधींविरोधात व्यक्ती कोर्टात
राहुल गांधी
| Updated on: Jan 22, 2025 | 3:26 PM
Share

बिहारमधील एका प्रकरणाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. राहुल गांधी यांच्या भाषणामुळे आपले 250 रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्याने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या भडकाऊ भाषणामुळे आपल्या हातात असलेली दुधाची बाटली भीतीने जमिनीवर पडली आणि नुकसान झाले असा अजब दावा या व्यक्तीने केला आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

सोनपूर येथील मुकेश चौधरीचा दावा काय?

समस्तीपूर येथील सोनपूर गावातील मुकेश कुमार चौधरी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने केलेल्या दाव्यानुसार, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारतीय राज्य व्यवस्थेविरोधात भडकाऊ भाषण दिले. 15 जानेवारी 2025 रोजी काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाच्या उद्धघाटनावेळी त्यांनी भाषण केले. आपली लढाई ही केवळ भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधातच नाही तर भारतीय राज्याविरोधात असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या दाव्यामुळे आपण घाबरल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे.

त्यांचा भारत राज्य व्यवस्थेला विरोध

कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनुसार, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय राज्य व्यवस्थेविरोधात लढाई करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी भारतीय राज्य व्यवस्थेला विरोध केला. त्यांनी त्यासाठी काहीही करण्याचा निर्धार केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

चौधरी म्हणाले की, राहुल गांधी यांचे हे भाषण त्यांनी टीव्ही आणि मोबाईलवर पाहिले. ज्यावेळी त्यांनी हे वक्तव्य पाहिले त्यावेळी ते घरातून दुधाची बादली घेऊन जात होते. पण या वक्तव्यामुळे ते इतके घाबरले की, त्यांच्या हातून बादली खाली पडली. त्यामुळे या बादलीतील 5 लिटर दूध जमीनवर सांडले, मोठे नुकसान झाले.

या घटनेमुळे आपले 250 रुपयांचे नुकसान झाले. तर त्यांच्या या वक्तव्याने मानसिक धक्का बसला तो वेगळाच. आपल्याला असुरक्षित वाटू लागले, असा दावा करत  रोसरा येथील प्राथमिक न्यायदंडाधिकाऱ्यांकडे त्यांनी नुकसान भरपाईसाठी दाद मागितली आहे.

(इनपुट- ज्योति कुमार सिंह)

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था