VIDEO : खाद्य पळवणाऱ्या रानडुकराला गेंड्यानं घडवली अद्दल, बाकीच्यांनी ठोकली धूम!

VIDEO : खाद्य पळवणाऱ्या रानडुकराला गेंड्यानं घडवली अद्दल, बाकीच्यांनी ठोकली धूम!
गेंडा आणि रानडुकराची झटापट

एका गेंड्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय, यामध्ये तो रानडुकराशी टक्कर देतोय. कारण तो त्याचं अन्न खाण्याचा प्रयत्न करत होता. गेंडा संतापतो आणि रानडुकराला त्याच्या शिंगानं उचलून मारतो. हे पाहून तिथं असलेली बाकीची डुकरं क्षणार्धात पळून जातात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 25, 2021 | 4:07 PM

या पृथ्वीवर अनेक धोकादायक प्राणी आहेत, ज्यांच्या नादाला लागणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. सिंह, वाघ, बिबट्या, गेंडा हे प्राणी हे जंगलात चांगले दिसतात खरे, मात्र मानवी वस्तीत आले तर दहशत निर्माण करतात. यामध्ये सिंह, वाघ आणि बिबट्या हे मांसाहारी प्राणी आहेत, पण गेंडा शाकाहारी आहे. मात्र असं असूनही त्याची गणना धोकादायक प्राण्यांमध्येच होते. सोशल मीडियावर या प्राण्याचे व्हिडिओ क्वचितच व्हायरल होत असले तरी एका गेंड्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय, यामध्ये तो रानडुकराशी टक्कर देतोय. कारण तो त्याचं अन्न खाण्याचा प्रयत्न करत होता.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका ठिकाणी काही गवत आहे, जे गेंडा खातोय. त्याचवेळी, त्याच्या शेजारी एक जंगली डुक्करदेखील आपलं तोंड त्यात घालतो. यानंतर दुसरं डुक्कर तिथं येतं आणि तेही गेंड्याच्या खाद्यात तोंड घालू लागतं. सुरुवातीला गेंडा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण तो अन्नात तोंड घालतच असल्यानं गेंडा संतापतो आणि रानडुकराला त्याच्या शिंगानं उचलून मारतो. हे पाहून तिथं असलेली बाकीची डुकरं क्षणार्धात पळून जातात, तर गेंड्यांनी जोरजोरात मारलेलं डुक्कर जमिनीवरच ओरडू लागतं.

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

जंगली डुकरंही कमी धोकादायक नाहीत, हेच यातून दिसतंय. ते त्यांच्या तीक्ष्ण दातांनी माणसांना फाडून टाकू शकतात, गेंडा हा एक महाकाय प्राणी आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची त्वचा इतकी जाड आहे, की रानडुक्कर आपल्या दातांनी त्याला इजा करू शकत नाहीत. nature27_12 या नावानं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. याला 19 हजारांहून अधिक व्ह्यूज असून 2,500हून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक केलंय. त्याचबरोबर व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

VIRAL : हातगाडीच्या वर कुत्र्यासाठी बांधलं छोटंसं ‘घर’, आयपीएस अधिकाऱ्यानं शेअर केला फोटो

VIDEO : बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, पुढे काय झाले हे पाहा ‘या’ थरारक व्हिडीओमध्ये!

VIDEO : न्यूझीलंडमधली कुप्रसिद्ध मांजर..! चोरते महिलांची अंतर्वस्त्रं, पोलीस म्हणतात…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें