वयाच्या 23 व्या वर्षी 11 मुलांची आई आहे ही तरुणी, आणखी हवीत 105 मुलं

रशियामध्ये (Russia) राहणारी 23 वर्षीय क्रिस्टिना ओझटार्क हिला मुलांची ऐवढी आवड आहे की तिला तब्बल 11 मुलं आहेत.

वयाच्या 23 व्या वर्षी 11 मुलांची आई आहे ही तरुणी, आणखी हवीत 105 मुलं

मॉस्को : लहान मुलं तर प्रत्येकाला आवडतात. त्यांचं एक हसू आपला सगळा ताण कमी करतं. पण हल्ली आर्थिक धोरणामुळे लोक छोटचं कुटूंब ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण अशा एक अशी घटना समोर आली आहे. ज्याचा तुम्ही विचार पण नाही करू शकणार. रशियामध्ये (Russia) राहणारी 23 वर्षीय क्रिस्टिना ओझटार्क हिला मुलांची ऐवढी आवड आहे की तिला तब्बल 11 मुलं आहेत. सध्या सोशल मीडियावर ही बातमी चांगलीच व्हायरस होत आहे. (Russia news 23 years old woman is mother of 11 kids and even planning to have more than hundred kids)

सगळ्यात विशेष म्हणजे ही 11 मुलंही कमी असून मी भविष्यात आणखी मुलांना जन्म देणार असून मला त्यांचीही आई व्हायचं असल्याचं क्रिस्टिनाने म्हटलं आहे. क्रिस्टीना म्हणाली की, मी सहा वर्षांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर मी या मुलांना जन्म दिला नाही आणि सरोगसीच्या (Surrogacy) मदतीने आम्ही इतर मुलांना जन्म दिला.

क्रिस्टीनाला भविष्यात 100 मुलांचं कुटुंब हवं आहे. या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंबंधी माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांना 105 मुलं हवी आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. आम्ही ऐवढ्या मुलांना जन्म देऊ की नाही माहिती नाही. पण आम्ही यासाठी नक्की प्रयत्न करणार असा निश्चय त्यांनी केला आहे.

क्रिस्टिनाचं कुटुंब जॉर्जियातील बटुमी इथं राहतं. क्रिस्टीना म्हणाली की, आम्ही ज्या ठिकाणी बटुमीमध्ये सरोगसीसाठी जातो तिथलं क्लिनिक आमच्यासाठी सरोगेट महिला निवडतात. आम्ही या महिलांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधत नाही किंवा त्यांच्याशी आमचा थेट संपर्कही होत नाही. (Russia news 23 years old woman is mother of 11 kids and even planning to have more than hundred kids)

संबंधित बातम्या – 

VIDEO : ‘मला माझ्या नवऱ्याकडे जाऊ द्या’, चिमुकलीचा बालहट्ट, ढसाढसा रडली!

डेटिंग अ‍ॅपद्वारे लोकांना प्रेम मिळवून देणारी व्हिटनी, ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश महिला

FACT CHECK | अ‌ॅमेझॉन नदीला सोनेरी रंग, खरंच नदीमध्ये सोन दडलंय?, जाणून घ्या फोटोमागचं सत्य

(Russia news 23 years old woman is mother of 11 kids and even planning to have more than hundred kids)

Published On - 10:15 am, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI