3 पायलट्स आणि प्रवाशांशी संबध, एअर होस्टेसची नोकरी सोडून आता सुरू केलं ‘हे’ काम…
माजी एअर होस्टेसने तिच्या कारकिर्दीतील धक्कादायक गुपिते उघड केली आहेत. विमानात झालेले मृत्यू, वैमानिक, क्रू मेंबर्स आणि प्रवाशांमधील संबंध आणि बऱ्याच धक्कादायक विषायंवर ती उघडपणे बोलली.

एअर होस्टेस… नाव ऐकताच अनेकांना वाटतं की हे आयुष्य फार ग्लॅमसर आणि चकमकीत असेल, पण त्यामागेही अनेक लाजिरवाण्या गोष्टी असतात. त्याबद्दल मात्र फारशा लोकांना माहीत नसतं. एअर होस्टेस म्हणून बरीच वर्ष काम करणाऱ्या एका महिलेने तिच्या तीन वर्षांच्या नोकरीदरम्यानचे अनेक धक्कादायक किस्से उघड केले, त्याबद्दल वाचून तुम्हीही अवाक व्हाल. विमान हवेत असतानाच झालेले मृत्यू, पायलट्स, प्रवासी आणि क्रू मेंबर्सचे शारीरिक संबंध अशा अनेक विषयांवर ती बोलली. एअर होस्टेस म्हणून काम केलेल्या अलाना पॉव (वय 22), हिने खरंतर वयाच्या 19 व्या वर्षी कारकिर्दीला सुरुवात केली आणि तीन वर्षे देशांतर्गत विमानांमध्ये काम केल्यानंतर तिने हे क्षेत्र सोडले. ती आता एक मॉडेल आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
अलानाने सांगितले धक्कादायक किस्से
माझं काम खूप कठीण होतं आणि माझ्यासमोर अनेक अशा घटना घडल्या ज्या धक्कादायक होत्या असं अलानाने स्पष्ट केलं. विमानांमध्ये जे घडते ते खरोखरच वेडेपणाचे असते. लोकांना वाटते त्यापेक्षा जास्त प्रवासी विमानात मरतात असंही ती म्हणाली. त्याबद्दल्चा एक किस्साही तिने सांगितला. एकदा, मेलबर्नहून केर्न्सला जाणाऱ्या विमानात, एक वृद्ध माणूस अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ शौचालयात होता. जेव्हा ते दार उघडले तेव्हा त्या इसमाचा मृतदेह एका सहकाऱ्यावर पडला. तो वृद्ध माणूस बेशुद्ध पडला होता आणि त्याची पत्नी देखील विमानात होती. विमानात आमच्याकडे डिफिब्रिलेटर असतं, म्हणून आम्ही त्या इसमाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण खूप उशीर झाला होता. अखेर ते विमान खाली उतरेपर्यंत आम्हाला त्या वृद्ध प्रवाशाचा मृतदेह जमिनीवर ठेवावा लागला अशी दु:खद आठवण तिने सांगितली.
पायलट्स, प्रवाशांचे असतात शारीरिक संबंध
माजी एअर हॉस्टेस असलेल्या अलानाने आणखी एक धक्कादायटक खुलासा केला आहे. क्रू मेंबर्स, पायलट्स आणि प्रवाशांमधील शारीरिक संबंध हे खूप सामान्य आहेत असे ती म्हणाली. माझे तीन पायलट्सशी संबंध होते, अशी कबुलीही तिने दिली, एवढंच नव्हे तर फर्स्ट क्लासमध्ये बिझनेस कार्ड देणाऱ्या एका प्रवाशाशीही शारीरिर संबंध ठेवल्याचे तिने कबूल केलं. अलाना म्हणाली की काही वैमानिक इतके नखरेबाज असतात की इतर सहकारी त्यांच्याबद्दल आम्हाला आधीच वॉर्न करतात. ते (पायलट्स) विमानाचे मुख्य प्रभारी असल्याने त्यांना जे काही करायचे ते करू शकतात. पणत्यातील बहुतेक जण फसवे आहेत. माझे तीन वैमानिकांशी संबंध होते. कधीकधी ते शीटवर माझे नाव पहायचे आणि टेक-ऑफ आणि लँडिंगसाठी मला कॉकपिटमध्ये बोलवायचे असंगही ती म्हणाली. “एक पायलट तर असा होता की, त्याला गर्लफ्रेंड असूनही लेओव्हर दरम्यान माझ्या घरी आला होता, जे खूप वाईट होते.” असा अनुभवही तिने सांगितला. दोन फ्लाईट्सदरम्यान जेव्हा हॉल्ट असतो, तेव्हा सर्व क्रू आणि पायलट एकत्र वेळ घालवतात.” असं तिने नमूद केलं.
2023 साली अलानाने तिची नोकरी सोडली आणि अडल्ट कंटेंटी रिलेटेड डिओ बनवण्यास सुरुवात केली. कारण तिची शरीरयष्टी आणि तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंमुळे लोक असं गृहीत धरत होते की ती या इंडस्ट्रीत आधीच काम करत होती. एकंदरीत, अलाना पॉवच्या या खुलाशातून विमान वाहतूक उद्योगामागील एक अज्ञात आणि धक्कादायक सत्य उघड होते. आपण बाहेरून पाहत असलेले जग आतून कसे खूप वेगळे असू शकते हेच तिच्या कहाणीतून दिसतं.
