Video | चेहऱ्यावर हसू, डोळ्यात समाधान; कृत्रिम हात बसवल्यावर चिमूरड्याला आकाश ठेंगणं

शल मीडियावर कधीकधी एखाद असा व्हिडीओ असतो ज्याला पाहून आपल्याला रडू कोसळतं. सध्या मात्र काहीसा वेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दु:ख, आनंद, समाधान, अशा भावनांची सरमिसळ आहे.

Video | चेहऱ्यावर हसू, डोळ्यात समाधान; कृत्रिम हात बसवल्यावर चिमूरड्याला आकाश ठेंगणं
SMALL BOY VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर कधी खळखळून हसायला लावणारे व्हिडीओ चर्चेत येतात. तर कधी थक्क करुन सोडणारे काही प्रसंग पाहायला मिळतात. मात्र सोशल मीडियावर कधीकधी एखाद असा व्हिडीओ असतो ज्याला पाहून आपल्याला रडू कोसळतं. सध्या मात्र काहीसा वेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दु:ख, आनंद, समाधान, अशा भावनांची सरमिसळ आहे.

कृत्रिम हात बसवताना आकाश ठेंगणं

व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका दिव्यांग मुलाचा आहे. या मुलाला एक हात नाहीये. व्हिडीओतील मुलगा अगदीच शांतपणे व्हील चेअरवर पसला आहे. त्याला कृत्रिम हात लावण्यात येत आहे. कृत्रिम हात बसवत असताना त्याला आकाश ठेंगणं झालं आहे. त्याच्या मनात आनंद मावेनासा झाल्याचं दिसतंय. त्याचं हसू कॅमेऱ्यात कैद करण्यात आलंय.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक छोटा दिव्यांग मुलगा आहे. तो व्हिलचेअर बसला असून त्याला कृत्रिम हात बसवण्यात येत आहे. त्याच्याजवळ एक डॉक्टर आहे. हात बसवण्याचे काम सुरु असताना छोटा मुलगा हरखून गेला आहे. आपल्याला सामान्य मुलासारखा हात असल्याची भावना त्याच्या मनात आली आहे. शेवटी हात बसवून झाल्यानंतर तो आनंदाने त्या हाताकडे बघतोय. तसेच दुसऱ्या हाताने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया 

हा भावनिक व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. पण त्याला पाहून लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. सध्या हा व्हिडीओ Amazing Posts या ट्विटर अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video: पाण्यात कासव आणि मगरीचं हात मिळवून ‘हाय-हॅलो’, नेटकरी म्हणाले, असा व्हिडीओ आधी पाहिला नाही

Viral: बर्फावर दोन पांडांची मस्ती, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आठवलं त्यांचं बालपण!

Yogi Aadityanath: जेव्हा योगी आदित्यनाथ मंचावर एका भाजप नेत्यावर भडकतात, बघा Video

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI