Video | दुबळ्या बदकाच्या मदतीला धावले कुत्र्याचे पिल्लू, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक बदक आणि कुत्र्याचे पिल्लू दिसत आहे. कुत्र्याचे छोटेसे पिल्लू निवांतपणे बसले आहे. तर बदकाचे पिल्लू त्याच्या आजूबाजूला खेळत आहे. मात्र, मध्येच बदकाचे पिल्लू खाली पडले आहे.

Video | दुबळ्या बदकाच्या मदतीला धावले कुत्र्याचे पिल्लू, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले
puppy and duck

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हैराण होतो. प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांचा मूड फ्रेश होतो. कदाचित याच कारणामुळे नेटकरी या प्राण्यांचे व्हिडीओ मोठ्या आवडीने पाहतात. सध्याचा व्हिडीओ तर अगदी खास आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याने बदकाला केलेली मदत टिपण्यात आली आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (small puppy helping duck to stand cute video went viral on social media)

बदकाला उठता येत नाहीये

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक बदक आणि कुत्र्याचे पिल्लू दिसत आहे. कुत्र्याचे छोटेसे पिल्लू निवांतपणे बसले आहे. तर बदकाचे पिल्लू त्याच्या आजूबाजूला खेळत आहे. मात्र, मध्येच बदकाचे पिल्लू खाली पडल्यामुळे मोठी अडचण झाली आहे. खाली दगडांध्ये कोसळल्यामुळे बदकाला उठता येत नाहीये. उभे राहण्यासाठी बदकाचे पिल्लू धडपडत आहे.

बदकाच्या मदतीला कुत्र्याचे पिल्लू धावले

बदकाच्या पिल्लाची ही धडपड कु्त्र्याच्या पिल्लाने ओळखली आहे. या पिल्लाने छोट्याशा बदकाकडे झेप घेतली आहे. तसेच आपल्या पायांनी तसेच तोंडाने कुत्र्याचे पिल्लू बदकाच्या पिल्लाला उचलण्याचा प्रयत्न करत आहे. कुत्र्याची मदत मिळाल्यामुळे बदकाचे पिल्लू उठून उभं राहण्यात यशस्वी ठरलेय. नंतर कुत्र्याचे पिल्लू बदकाच्या पिल्लाजवळ जाऊन बसले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा मजेशीर व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच गोंडस कु्त्र्याच्या पिल्लांच काम पाहून सगळेच भारावून गेले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईकही केले जात आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Viral Video : ‘इन्स्टा’साठी रस्त्याच्या मधोमध उभं राहून डान्स, लोक म्हणाले, मूर्खपणाची हद्द असते

Video | रस्त्याच्या वळणावर मस्ती, तरुण थेट आला बसखाली, व्हिडीओ व्हायरल

Video | इच्छेविरुद्ध लग्न होत असल्यामुळे नाराज, भर मंडपात नवरीने केलं ‘हे’ काम, व्हिडीओ व्हायरल

 

(small puppy helping duck to stand cute video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI