AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातले असे काही देश जेथे केवळ 4 दिवस लोक करतात काम, इतर दिवस काय करतात ?

जगात काही देशात आठवड्यातून चार दिवस काम करण्याचे वर्क कल्चरल राबवले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या गुणवत्तेत उलट सुधारणा झाल्या आहेत.

जगातले असे काही देश जेथे केवळ 4 दिवस लोक करतात काम, इतर दिवस काय करतात ?
4 DAY A WEEK JOBS
| Updated on: Apr 25, 2026 | 5:10 PM
Share

आजकाल धावपळीच्या जीवनात कामाचा ताण इतका वाढला आहे की लोकांना स्वत:साठी वेळ काढणे कठीण झाले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत ऑफीस आणि जबाबदारीत अडकलेले लोक नेहमीच थकवा आणि तणावाचा सामना करत आहेत. अशात जर कोणी आठवड्याचे चार दिवस काम करा आणि उर्वरित दिवस स्वत:ला द्या म्हटले तर..हे स्वप्नवत वाटत असेल मात्र ही कल्पना नाही. अनेक देशात हे एक नवे वर्क मॉडेल बनले आहे.

काय आहे 4-डे वर्क विकचा कन्सेप्ट?

4-डे(Day) वर्क विकचा अर्थ कर्मचाऱ्यांना आठवड्यातील पाच दिवसाच्या ऐवजी केवळ चार दिवस काम करायचे असते. यात एक खास “100-80-100” मॉडेल आत्मसात केले जाते. म्हणजे कर्मचाऱ्यांना 100% सॅलरी मिळते, ते 80% वेळ काम करतात आणि मात्र ,त्यांच्याकडून 100% प्रोडक्टिव्हीटीची आशा केली जाते. या मॉडेलचा मुख्य हेतू कर्मचाऱ्यांनी कमी वेळेत चांगले काम करावे आणि त्यांना खाजगी जीवनासाठी देखील पुरेसा वेळ मिळाला.

या वर्क कल्चरची सुरुवात युरोपातून झाल्याचे म्हटले जाते. बेल्झियम (Belgium)सारख्या देशांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना चार दिवस काम करण्याचा अधिकार दिला. याशिवाय पोर्तुगाल, स्पेन आणि फ्रान्स सारख्या देशातही या मॉडेलला ट्रायल वा पायलट प्रोजेक्टच्या रुपात स्वीकारण्यासाठी काम करत आहेत. या देशांचे मानने आहे की यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता (Efficiency)  वाढते आणि ते जास्त आनंदी राहतात.

आता हा ट्रेंड केवळ युरोपापर्यंत मर्यादित राहिलेला नाही, आशियाई देशातही वेगाने पसरत आहे. जपानसारख्या देशाचे सरकार देखील या मॉडेलला प्रोत्साहन देत आहे.तसेच फिलीपाईन्समध्ये ऊर्जा वाचवण्याच्या उद्देश्याने सरकारी कर्मचाऱ्यांना चार डे वर्क विक लागू केलेला आहे. या वरुन हे स्पष्ट होते की वेगवेगळ्या कारणाने का होईल परंतू हे मॉडेल जगभर आपलेसे केले जात आहे.

काय म्हणते संशोधन ?

अनेक रिसर्च आणि रिपोर्ट्स मध्ये हे पुढे आले आहे की जेव्हा कर्मचाऱ्यांना आठवड्याचा चार दिवस काम करायचे असते, तेव्हा त्यांची प्रोडक्टिव्हीटी स्पष्टपणे वाढताना दिसते. कमी वेळात काम पूर्ण करण्याच्या कारणाने जास्त फोकस आणि एनर्जीसोबत आपल्या टास्कला चांगल्या प्रकारे पूर्ण केले जाते. यासोबत दीर्घकाळ सतत काम केल्याने येणारा तणाव आणि बर्नआऊट देखील बऱ्याच प्रमाणात कमी होतो. ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले रहाते.

अनेक कंपन्यांचा अनुभव हेच सांगतो की जेव्हा कर्मचाऱ्यांना काम आणि खाजगी जीवन या संतुलन बनवण्याची संधी मिळते तेव्हा ते जास्त आनंदी आणि संतुष्ठ राहातात. याचा थेट परिणाम त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर थेट होतो.ते जास्त क्रिएटिव्ह आणि जबाबदारीने काम करतात. ज्यामुळे कंपन्यांची कामगिरी चांगली होते आणि त्यांच्या एकूण उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळते.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?