भारतातलं अनोखं घर, दोन दरवाजे दोन राज्यांमध्ये, सासू-सूनाची बोलण्याची पद्धत पाहून अवाक व्हाल

भारतात असं एक घर आहे ज्या घराचे दोन दरवाजे थेट दोन राज्यांमध्ये उघडतात. हे ऐकूण तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण असं खरोखर घडलंय.

भारतातलं अनोखं घर, दोन दरवाजे दोन राज्यांमध्ये, सासू-सूनाची बोलण्याची पद्धत पाहून अवाक व्हाल
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 17, 2021 | 3:09 AM

चंदीगड : जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याविषयी ऐकलं की आपण आश्चर्यचकित होतो. जगंच कशाला अगदी आपल्या इतक्या मोठ्या देशात देखील असंख्या गोष्टी आपल्याला अवाक करतात. अशाच एक गोष्टीचा आपण आढावा घेणार आहोत. भारतात असं एक घर आहे ज्या घराचे दोन दरवाजे थेट दोन राज्यांमध्ये उघडतात. हे ऐकूण तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण असं खरोखर घडलंय. हे घर पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर आहे. या घराचा एक दरवाजा पंजाबमध्ये उघडतो, तर दुसरा दरवाजा हरियाणात उघडतो (Story of Unique house which has doors opening in two different state of India).

गाव असो, राज्य असो की देश, प्रत्येक ठिकाणी सीमारेषा लागते. सीमा बदलली की त्या त्या गोष्टींची ओळख बदलते. म्हणूनच वेगवेगळ्या सीमारेषेंची गोष्ट मजेशीर होते. यात आता घराचा समावेश झालाय. हे घर सीमेमुळं चांगलाच चर्चेचा विषय ठरलंय. 70 वर्षांच्या जगवंती देवी आपल्या कुटुंबासोबत धर्मशाळेजवळील घरात राहतात. मात्र, त्यांच्या या घराचा एक दरवाजा पंजाबमध्ये उघडतो, तर दुसरा दरवाजा हरियाणात उघडतो. त्यामुळेच या घराच्या मधोमध भींत उभी राहिलीय. यामागे कौटुंबिक वादाचं कारण नसून सरकारी कार्यालयांची विभागणी हे कारण आहे.

काय आहे प्रकरण?

रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी जगवंती देवींनी आपल्या घराचं बांधकाम केलं. घर वाढल्याने त्याचा अर्धा भाग हरियाणा राज्याच्या सीमेत गेला. त्यांनी वीज कनेक्शनसाठी 3 महिन्यापूर्वी अर्ज केला होता. मात्र, जमिनीची नोंदणी उर्दूत आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे ही नोंद पंजाबी भाषेत करण्यात आली. त्यावरही आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर ही नोंद इंग्रजीत करण्यात आली. यानंतर तरी वीज कनेक्शन मिळेल असं वाटलं, पण वीज महामंडळाने आक्षेप घेतला.

हे घर दोन राज्यांच्या सीमारेषेवर बांधण्यात आल्याने घरात भींत उभी केली जात नाही तोपर्यंत वीज कनेक्शन मिळणार नाही अशी भूमिका घेतली. नाईलाजाने जगवंती बाईंनी आपल्याच घरात एक भिंत उभी केलीय. राज्य निर्मितीचा विचार केला तर आधी पंजाबमधूनच हरियाणा वेगळं राज्य झालं. तेव्हा देखील अनेक घरांमधून सीमारेषा गेली आणि काही अडचणी तयार झाल्या होत्या. या घरात तर भिंत उभी राहिल्याने सासू सूनेला भिंतीच्या छोट्याशा खिडकीतून बोलावं लागत आहे. त्यामुळेच हे घर चर्चेचा विषय ठरलं.

हेही वाचा :

VIDEO | भंडाऱ्यात एकाच घरी निघाले तीन विषारी साप, पाहा थरारक व्हिडीओ

VIDEO : येवल्यात घराला आग, मुलीच्या लग्नासाठी गोळा केलेला संसार जळून खाक

बंद घराचा कडी-कोयंडा उचकटला, पोटमाळ्यावरुन शेजारच्या घरात चोरी, रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

व्हिडीओ पाहा :

(Story of Unique house which has doors opening in two different state of India)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें