स्वामी चैतान्यंदचे घाणेरडे चाळे, सोशल मीडियावर मुलींच्या फोटोवर कमेंट्स.. स्क्रीनशॉट व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून स्वामी चैतान्यंद चांगलाच चर्चेत आहे. त्याचे काळे कृत्य एकापाठोपाठ एक समोर येत आहेत. आता त्याने सोशल मीडियाचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.

खासगी संस्थेतील 17 विद्यार्थिनींनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यानंतर स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सध्या या प्रकरणाची पोलिस तपासणी सुरू आहे. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सोशल मीडियावर खूप सक्रिय होता आणि वेगवेगळ्या मुलींच्या प्रोफाइल्सचा शोध घेत होता. जेव्हा एखादी अनोळखी मुलगी तिचा फोटो पोस्ट करायची, तेव्हा बाबा त्वरित त्या फोटोवर कमेंट करायचा. तसेच तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा.
स्वामी चैतान्यंदचे घाणेरडे चाळे आता समोर आले आहेत. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा प्रकार केवळ एक-दोन मुलींपुरता मर्यादित नव्हता. तर बाबाने वेगवेगळे खासगी आकाऊंट सुरु केले होते. तो या अकाऊंटसवरुन स्क्रोल करून मुलींशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायचा. आता त्याने कमेंट्स केलेल्या काही मुलींच्या फोटोचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वाचा: मोठी बातमी! अपघाता वेळी गौतमीच्या गाडीत होता मोठा अधिकारी? काय करत होता? खळबळजनक दावा काय?
मोबाइल चॅट्समुळे खुलासा
एवढेच नाही, तर पोलिसांना बाबाच्या मोबाइलमध्ये असे अनेक चॅट्स सापडले आहेत जे या प्रकरणातील सर्वात ठोस पुरावे ठरले आहेत. या चॅट्समध्ये बाबा विद्यार्थिनींना सातत्याने मेसेज पाठवत होता आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. अनेकवेळा त्याने अश्लील संभाषण केले, खासगी फोटो मागितले आणि खोटी आश्वासने देऊन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.
17 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
दिल्लीच्या एका न्यायालयाने सध्या स्वामी चैतन्यानंद यांना 17 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. सुनावणी दरम्यान बाबाच्या वकिलाने अनेक प्रश्न उपस्थित केले, विशेषत: त्यांना कोणत्या कलमांतर्गत कोठडीत घेतले जात आहे याची माहिती मागितली. तपास अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदाराच्या दुसऱ्या एफआयआरनंतर कलम 232 जोडण्यात आले आहे.
बाबाच्या मागण्या कमी रंजक नाहीत
एवढेच नाही, तर कोर्टात बाबाच्या वकिलाने अशी मागणी केली की, त्यांना नियमित औषधे, सात्विक भोजन (ज्यामध्ये कांदा-लसूण नसावे), धार्मिक वस्त्रे आणि आध्यात्मिक सामग्री ठेवण्याची परवानगी द्यावी. याशिवाय, केस डायरीवर स्वाक्षरी करण्याची मागणी केली गेली, आणि त्यांच्याविरुद्ध काही षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा केला गेला. न्यायालयाने हे सामान्य प्रक्रिया मानत कोणताही विशेष आदेश दिला नाही.
विद्यार्थ्यांना धमकावणे आणि दबाव टाकण्याचे आरोप
संस्थेशी संबंधित अनेक विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचे मोबाइल फोन आणि शैक्षणिक कागदपत्रे जबरदस्तीने घेतली गेली आणि विरोध केल्यास त्यांना निष्कासित करण्याची धमकी देण्यात आली. तसेच, पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान बाबाने ना पश्चात्ताप दर्शवला, ना सहकार्याचा दृष्टिकोन स्वीकारला.
