गाव कसले हे तर रेल्वेपूर! भाऊ, बहीण, वडील, आजोबा पण रेल्वेत, तीन पिढ्या सुद्धा सेवेत
Railway Town of India : हो हे आहे देशाचं रेल्वेपूर, रेल्वेचे गाव. कारण या गावाची लोकसंख्या अवघी 1200 इतकी आहे. तर रेल्वेत काम करणार्यांची संख्या 200 इतकी आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील कोणी ना कोणी रेल्वेत कर्मचारी आहे.

आपल्याकडे काही गावातील लोक हे देशाच्या सेवेत असतात. त्या गावातील अनेक जण एक तर लष्करात नाही तर पोलीस दलात असतात. एखादं गावातून प्रशासकीय अधिकारी बाहेर पडतात. पण हे गाव तर जणू रेल्वेपूर आहे. हे रेल्वेचे गाव आहे. कारण या गावाची लोकसंख्या अवघी 1200 इतकी आहे. तर रेल्वेत काम करणार्यांची संख्या 200 इतकी आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील कोणी ना कोणी रेल्वेत कर्मचारी आहे.
कुठे आहे हे गाव
झारखंड राज्यातील बोकारो जिल्ह्यात माचाटांड – आलुवारा गावीतील घरटी कोणी ना कोणी रेल्वे विभागात आहे. या गावाची लोकसंख्या अवघी 1200 इतकी आहे. तर 200 लोकांहून अधिक जण रेल्वेत कर्मचारी आहे. काही कुटुंबातील तर पाच पाच, 6-6 सदस्य रेल्वेत नोकरीला आहेत.




एकाच कुटुंबातील अनेक लोक रेल्वेत
रतनलाल महतो यांच्या कुटुंबातील 6 सदस्य रेल्वेत आहेत. रतनलाल आणि त्यांचे तीन भाऊ शोभाराम महतो, जोधाराम महतो आणि श्रीपति महतो रेल्वेत आहेत. श्रीपति महतो यांची दोन मुलं सुभाष आणि कन्हाई हे दोघे पण रेल्वेत कर्मचारी आहेत. तर खेदुराम महतो यांच्या घरातील पाच सदस्य रेल्वेत कर्मचारी आहेत. त्यांचे दोन मुलं, त्यांचे दोन नातू, बहिणीचा मुलगा हे सर्व रेल्वेत कर्मचारी आहेत. तर त्यांच्या भावाच्या कुटुंबातील सदस्य पण रेल्वेत नोकरीला आहेत.
मुलगा-वडील, आजोबा रेल्वेत
तर या गावातील मुलगा, वडील, आजोबा, बहीण-भाऊ रेल्वेत कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे देशातील विविध भागातील रेल्वे विभागात ते कार्यरत आहेत. भाऊ-भाऊ नोकरीत असलेली अनेक कुटुंब या गट ग्रामपंचायतीमध्ये आहे. तर तीन पिढ्या सुद्धा रेल्वेत असणारी कुटुंब या गावात आहेत.
या गावातील काही रेल्वे कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. ते इतर ठिकाणी स्थायिक झाले असले तरी त्यांचा वर्षातील मोठा काळ याच गावात जातो. त्यातील काही जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण सेवानिवृत्तीवर शेती घेऊन ती कसत आहेत. या गावातील नागरिकांना रेल्वेकडून अनेक सोयी-सुविधा मिळतात.