Steam Engine Tractor: एकाच वेळी 44 फाळके ओढून विश्वविक्रम, पाहा वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या ट्रॅक्टरची अफाट क्षमता

या नांगरांना एक भारधस्त ट्रॅक्टर ओढत आहे. हा असा तसा ट्रॅक्टर नाही, याची चाकही पोलादी आहेत, समोर वाफेचं इंजिन लागलेलं आहे, ज्याच्या चिमणीतून आगगाडीसारखा धूर बाहेर पडतो आहे.

Steam Engine Tractor: एकाच वेळी 44 फाळके ओढून विश्वविक्रम, पाहा वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या ट्रॅक्टरची अफाट क्षमता
या ट्रॅक्टरने सर्वाधिक फाळके ओढण्याचा आधीचा जागतिक रेकॉर्ड तोडत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.


इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक ट्रॅक्टर तब्बल 44 फळकी ओढत आहे, आणि एकाच वेळी शेकडो हेक्टरचं शेत नांगरत आहे. बरं हा ट्रॅक्टर साधा सुधा नाही बरका. वाफेच्या इंजिनावर चालणारा हा ट्रॅक्टर आहे. हो, तुम्ही नीट ऐकताय, वाफेच्या इंजिनावर हा ट्रॅक्टर चालतो, जशा आधी रेल्वेगाड्या वाफेच्या इंजिनावर चालायच्या. रेल्वे इंजिनाप्रमाणेच हा भारधस्त आणि पॉवरफूल आहे. (The world record for a tractor running on a steam engine, pulled along with 44 plows. The video went viral)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका भल्यामोठ्या शेतात नांगरणी सुरु आहे. शेकडो लोक तिथं जमले आहे. त्यातच अनेक फाळके आणि त्यावर उभे असलेले लोक दिसतात. व्हिडीओ पुढं गेल्यावर कळतं की, या नांगरांना एक भारधस्त ट्रॅक्टर ओढत आहे. हा असा तसा ट्रॅक्टर नाही, याची चाकही पोलादी आहेत, समोर वाफेचं इंजिन लागलेलं आहे, ज्याच्या चिमणीतून आगगाडीसारखा धूर बाहेर पडतो आहे. हा ट्रॅक्टर अतिशय मजबूतीने या नांगरांना ओढत आहे.

या ट्रॅक्टरने तब्बल 44 फाळकी ओढून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. 1905 मध्ये हा ट्रॅक्टर बनवण्यात आला होता, मात्र त्याला कोरी अँडरसन नावाच्या व्यक्तीने पुन्हा रिबिल्ड करत अधिक शक्तीशाली आणि वजनदार केलं आहे. कोरीने तब्बल 10 वर्ष हा ट्रॅक्टर बनवण्यात घालवली. त्यांच्यामते इतिहासातील संशोधनं, उपकरणं आपण चालू अवस्थेत ठेवायला हवीत.

पाहा व्हिडीओ:

 

 

1905 मध्ये हा ट्रॅक्टर बनवण्यात आला होता. पण आता हा पुन्हा नव्याने बनवला गेला आहे. या ट्रॅक्टरच्या इंजिनमध्ये दगडी कोळसा टाकावा लागतो. जसा आधी वाफेवरच्या इंजिन असणाऱ्या रेल्वेगाड्यांना टाकला जायचा. हा ट्रॅक्टर तब्बल 300 HP पॉवर जनरेट करतो. जगातील सर्वात फास्ट गाड्यांपैकी एक असलेल्या लॅम्बोर्गिनी अॅव्हेटाडॉरहून याचा टॉर्क तब्बल 15 पट जास्त आहे. या ट्रॅक्टरने सर्वाधिक फाळके ओढण्याचा आधीचा जागतिक रेकॉर्ड तोडत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

हेही पाहा:

Video: गर्भवती महिला ट्रेनरवर अस्वलाचा हल्ला, जमिनीवर पाडून नखांचे ओरखडे, हादरवून सोडणारा व्हिडीओ

शरीर माशाचं आणि तोंड मगरीचं, लाकडाच्या तुकड्याचा क्षणांत भूगा, झारखंडमध्ये सापडलेल्या माशाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI