मर्सिडीजसह पठ्या थेट दफनभूमीत, मग काय लोकांनी कारसह गाडले जमिनीत, तुम्ही पण म्हणाल हे काय पाहतोय, Video पाहाच
Shocking Grave Party : समाज माध्यमावर केव्हा काय पाहायला मिळेल, हे सांगताच येत नाही. प्रसिद्धीसाठी सर्व तमाशा सुरू असतो. आपण तो मूक दर्शक म्हणून पाहतो. तर काही जण त्यावर कमेंट्स करून मनातील राग व्यक्त करतात. या व्यक्तीने पण असंच काही केले आहे.

समाज माध्यमावर लोकप्रिय होण्यासाठी कोण, केव्हा, काय करेल ते सांगताच येत नाही. अनेक लोक अतरंगी असतात. ते काहीतरी विचित्र काम करून लोकांचे व्ह्यूज मिळवण्याचा, लक्ष वेधण्याचे काम करतात. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. त्यात काही लोक असेच काही करतात. पण त्यांचा हा आगाऊपणा अनेकांना खटकतो. अनेक जण प्रसिद्धीसाठी असा जीव धोक्यात घालण्याची गरजच काय ? असा सवाल विचारत आहेत. या व्हिडिओत एक व्यक्ती त्याची मर्सिडीज कार घेऊन (Man buried with Mercedes car) थेट दफनभूमीत पोहचतो. त्याला लोक कारसह दफन करतात. पण त्यानंतरच्या दृश्यावर तुम्हाला पण विश्वास बसणार नाही. तुम्ही म्हणाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणी असं करतं का?
व्हिडिओ रशियातील




इंस्टाग्राम अकाऊंट @chebotarev_evgeny वर रशियन व्यक्तीचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात अत्यंत धोकादायक स्टंट करताना दिसतो. या स्टंटचा पूर्ण व्हिडिओ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओनुसार ही व्यक्ती त्याची कार दफनभूमीत आणतो. मर्सिडीज कार तो एका कबरीसाठी खणलेल्या जागेत आणतो. त्यानंतर त्याचे मित्र अजून भयंकर प्रकार करतात.
कारसह व्यक्तीला जमिनीत गाडतात
ही व्यक्ती या दफनभूमीत त्याच्या महागड्या मर्सिडीज कारसह येतो. तिथे अगोदर खोदलेल्या खड्यात ही कार तो नेतो. तर त्याचे मित्र वरतून या कारवर माती टाकतात. इतकेच नाही तर जेसीबीच्या सहाय्याने माती लोटण्यात येते. त्यानंतर ही कार पूर्णपणे जमिनीत गाडण्यात आल्याची खात्री करण्यात येते. या कारच्या आत ती व्यक्ती तशीच दिसते. ही व्यक्ती आत दबल्यानंतर त्या कारची अवस्था दाखवतो. त्या व्यक्तीला कशाची ही भीती वाटत नाही. उलट तो आनंदी असल्याचे दाखवतो. त्याचा हातात एक वाईनची बॉटल दिसते. ती व्यक्ती हातात वाईनची बॉटल घेऊन ती पिण्याची तयारीत असतानाचे या व्हिडिओत दिसते.
View this post on Instagram
व्हिडिओ झाला व्हायरल
या व्हिडिओला आतापर्यंत 10 कोटींहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर अनेक लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. प्रसिद्धीसाठी कोणी इतका बिनडोकपणा करेल असे वाटले नाही, अशी कमेंट अनेक युझर्स करतात. काहींनी तर इन्स्टा आणि मेटाकडे हे चॅनल बंद करण्याचे आवाहन केले आहे. श्रीमंत बापाची बिघडलेली मुलं अशा कमेंट पण टाकण्यात आल्या आहेत. या व्यक्तीला जमिनी खाली ऑक्सिजन तरी कसा मिळत असेल असा प्रश्न केला आहे.